स्वत:मधील ऊर्जा प्रेरित करा : श्रद्धा सुब्रमण्यम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वत:मधील ऊर्जा प्रेरित करा : श्रद्धा सुब्रमण्यम
स्वत:मधील ऊर्जा प्रेरित करा : श्रद्धा सुब्रमण्यम

स्वत:मधील ऊर्जा प्रेरित करा : श्रद्धा सुब्रमण्यम

sakal_logo
By

आपण दिवसभरात किती काम करतो आणि कधी थकतो, याचा आलेख तयार करायला हवा. एखादे कार्य करण्यासाठी माणसाला वेळेची आवश्यकता असते. तसेच माणसात ऊर्जा असेल तर तेच कार्य वेळेत पूर्ण करता येते. त्यामुळे माणसाने आपल्या आतील ऊर्जा प्रेरित करून काम करायला हवे, असा सल्ला स्पार्कलिंग सोल कंपनीच्या संस्थापक इन्ट्यूशन एक्सपर्ट श्रद्धा सुब्रमण्यम यांनी तरुणांना दिला.
‘जीवनाचा समतोल’ कसा राखायचा? या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. पुढे बोलताना त्या म्हणाल्या, ‘‘तुमची ऊर्जा तुमची ब्लू प्रिंट आहे. ठराविक वेळेत आपली ऊर्जा का कमी होते. याचा अभ्यास करायला हवा. स्वतःची ओळख निर्माण करणे महत्त्वाचे आहे. अनावश्यक ठिकाणी ऊर्जा खर्च करू नये. काही लोकांशी संभाषण करताना आपली ऊर्जा कमी होते. आपल्या अंतकरणात काय सुरू आहे, हे खूप महत्त्वाचे असते. अनुभव आणि आंतरप्रेरणेने पुढे जायला हवे. प्रत्येकाची आंतर प्रेरणा ही वेगवेगळी असू शकते.’’

सुब्रमण्यम म्हणाल्या...
- स्वतःवर प्रेम करायला हवे, कधीतरी स्वतःला मिठीत घ्यायला हवे
- काही गोष्टींकडे दुर्लक्ष करायला शिकले पाहिजे
- अनुभवातून धडा घेऊन पुढची वाटचाल करायला हवी
- काही गोष्टी आपण करू शकतो की नाही, हे स्वतःला विचारावे
- नकारात्मक गोष्टी लवकर सांगता येतात, सकारात्मक गोष्टी सांगायला वेळ लागतो
- घर, महाविद्यालय अशा प्रत्येक ठिकाणी आपली भूमिका वेगळी असते. मग आपण कोण? याचा शोध घेतला पाहिजे

PNE23T43243