‘जिजामाता विद्वत गौरव’ प्रकाश निकते यांना पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘जिजामाता विद्वत गौरव’ 
प्रकाश निकते यांना पुरस्कार
‘जिजामाता विद्वत गौरव’ प्रकाश निकते यांना पुरस्कार

‘जिजामाता विद्वत गौरव’ प्रकाश निकते यांना पुरस्कार

sakal_logo
By

पुणे, ता. ३० : पंढरपूर येथील नामदेवगाथाव्रती प्रकाश निकते यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. छत्रपती सेवा प्रतिष्ठान नागपूर-पुणेतर्फे देण्यात येणाऱ्‍या जिजामाता विद्वत गौरव पुरस्काराचे यंदा ४१ वे वर्ष आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे विश्‍वस्त मनीष उद्धव, प्रतिष्ठानचे पुण्यातील कार्यकर्ते व प्रतिनिधी मंगेश बरबडे, पत्रभेट प्रकाशनाच्या संपादिका स्मिता काटेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

श्रीशनेश्‍वर धाम मंगल कार्यालय, सांगोला रोड, पंढरपूर येथे हा कार्यक्रम शुक्रवार, (ता. २) जून रोजी सकाळी साडेदहा वाजता होणार आहे. या सोहळ्याचे अध्यक्षस्थान आचार्य अमृताश्रम स्वामी महाराज (बीड) हे भूषविणार आहेत. विशेष पाहुणे म्हणून धर्मभास्कर सदगुरू दस महाराज (शिवकथकार विजयराव देशमुख) हे उपस्थित राहणार आहेत. १९८२ पासून सुरू केलेला हा पुरस्कार आजवर डॉ. वा. वि. मिराशी, डॉ. व्ही. बी. कोलते, धुंडामहाराज देगलूरकर, ग. ह. खरे, मुकुंद जाटदेवळेकर, पं. हृदयनाथ मंगेशकर, डॉ. जयसिंगराव पवार, डॉ. रामचंद्र देखणे, भारतरत्न सुरसम्राज्ञी लता मंगेशकर आदी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या, अशा दिग्गज व्यक्तींना प्रदान करण्यात आला आहे.

छत्रपती सेवा प्रतिष्ठान नागपूर-पुणेतर्फे ३५० व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवकथाकार विजयराव देशमुख यांचे ‘युग प्रवर्तक शिवराज्याभिषेक या विषयावर जाहीर व्याख्यान होणार आहे. हा कार्यक्रम रविवार (ता. ४) जून रोजी सायंकाळी ६ वाजता गरवारे महाविद्यालय सभागृह, कर्वे रस्ता येथे आयोजित केला आहे.