वेताळ टेकडी बचावसाठी मनसेचे उपोषण

वेताळ टेकडी बचावसाठी मनसेचे उपोषण

पुणे, ता. ५ : ‘‘वेताळ टेकडीचा ऱ्हास करून विकासाच्या नावाखाली बालभारती ते पौड फाटा रस्त्याचा जो जबरदस्तीने घाट घातला जात आहे. त्याला मनसेचा विरोध असून असे प्रकल्प महापालिकेने राबवू नयेत. प्रशासनाने ऐकले नाही तर पुढच्या काळात हात सोडून मनसेच्या पद्धतीने आंदोलन करू’’, असा इशारा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका प्रशासनाला सोमवारी दिला.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पुणे शहर मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यावतीने ‘वेताळ टेकडी वाचवा पर्यावरण संरक्षण व जनजागृती’साठी सेनापती बापट रस्त्यावर बालभारती संस्थेच्या प्रवेशद्वारावर उपोषण आंदोलन केले. या वेळी वेताळ टेकडी बचाव कृती समितीच्या सदस्या डॉ. सुमिता काळे, डॉ. सुषमा दाते, डॉ. कल्याण गंगवाल, समीर सिंदगी, मनसेचे प्रवक्ते अनिल शिदोरे, बाबू वागस्कर, बाळा रोडगे, किशोर शिंदे, हेमंत संभूस, गणेश सातपुते, रणजित शिरोळे, साईनाथ बाबर, अमोल शिंदे, योगेश खैरे, संतोष पाटील आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com