फसवणूकप्रकरणी बँक अधिकाऱ्यांसह पाच जणांवर गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फसवणूकप्रकरणी बँक अधिकाऱ्यांसह पाच जणांवर गुन्हा
फसवणूकप्रकरणी बँक अधिकाऱ्यांसह पाच जणांवर गुन्हा

फसवणूकप्रकरणी बँक अधिकाऱ्यांसह पाच जणांवर गुन्हा

sakal_logo
By

केसनंद, ता. १६ : बँकेतील जमा कागदपत्रांच्या साहाय्याने खातेदारांच्या परस्पर वाहन व फ्लॅटखरेदीसाठी आर्थिक व्यवहार करून फसवणूक केल्याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी बँक अधिकाऱ्यांसह पाच जणांवर गुन्हा दाखल केला.
याप्रकरणी वृषाली हनुम‌ंत गव्हाणे यांच्या फिर्यादीवरून लोणीकंद पोलिसांनी गजानन साकोरे (वय ३५, रा. केंदूर), सचिन सातपुते (वय ४०, चंदननगर), गजानन कुलकर्णी (वय ५५, रा. लांडेवाडी), कुलदीप शर्मा (वय ४१, रा. सिंहगड रोड, पुणे) अजितकुमार लोंढे (वय ५३, रा. रास्ता पेठ,पुणे) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, वृषाली यांचे पती हनुमंत गव्हाणे यांनी कोरेगाव भीमा येथील फर्निचर दुकानाकरीता अण्णासाहेब मगर बॅंकेतून व्यवसायासाठी १५ लाख रुपये कर्ज घेतले होते. त्यासाठी नातेवाईक गजानन साकोरे यांच्या ओळखीतून सचिन सातपुते यांची जमीन बँकेत तारण ठेवण्यात आली. त्यानंतर सहा महिन्याने सचिन सातपुते यांना ऑडी मोटारीसाठी गव्हाणे यांच्या नावावर पुन्हा बँकेने २ फेब्रुवारी २०१६ रोजी ४८ लाख रुपयांचे कर्ज मंजूर केले. मात्र मोटार खरेदी न करताच त्यातील ४० लाख रुपये हनुमंत गव्हाणे यांच्या परवानगीशिवाय सचिन सातपुते यांच्या खात्यावर वळविण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Kbm22b02315 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top