खडकी कॅन्टोन्मेंट, महावितरणकडून झाडांची छाटणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खडकी कॅन्टोन्मेंट, महावितरणकडून झाडांची छाटणी
खडकी कॅन्टोन्मेंट, महावितरणकडून झाडांची छाटणी

खडकी कॅन्टोन्मेंट, महावितरणकडून झाडांची छाटणी

sakal_logo
By

खडकी, ता. २१ : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर खडकी कॅन्टोन्मेंटकडून हद्दीतील झाडांच्या फांद्यांची गुरुवारी (ता. १९) छाटणी करण्यात आली. तसेच महावितरणकडूनही विजेच्या तारांमध्ये गुंतलेल्या फांद्या छाटण्यात आल्या. पावसात झाडपडीसारख्या घटना होऊ नये, तसेच विजेच्या खांबांत फांद्या अडकून वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठी दोन्ही विभागांच्या वतीने संयुक्तरित्या खबरदारी म्हणून झाडांच्या फांद्या छाटण्याचे काम सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, झाडांच्या छाटणीवेळी सुमारे एक तास वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे अनेकांची कामे खोळंबली.

Web Title: Todays Latest Marathi News Kir22b00389 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..