दुभाजकाच्या कामामुळे वाहतुकीला अडथळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुभाजकाच्या कामामुळे वाहतुकीला अडथळा
दुभाजकाच्या कामामुळे वाहतुकीला अडथळा

दुभाजकाच्या कामामुळे वाहतुकीला अडथळा

sakal_logo
By

खडकी, ता. २४ ः खडकीतील वाहतूककोंडी व व्यापारी वर्गाची समस्या सोडवण्यासाठी नागरिक व ''सकाळ''च्या पाठपुराव्यानंतर अखेर आयुध चौकापासून ते एमएसईबी चौकापर्यंत दुभाजक घालण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे, मात्र या कामाचे सूचना फलक लावण्यात आले नसल्यामुळे वाहनचालकांचा गोंधळ उडत असून, वाट मिळेल तेथून वाहने घुसविली जात असल्याचे चित्र सध्या खडकी बाजारात दिसत आहे. प्रशासनाने योग्य त्या उपाययोजनांची अंमलबजावणी करावी, अशी नागरिकांनी मागणी केली आहे.


येथे बसविल्या जाणाऱ्या दुभाजकाची उंची खूप छोटी असल्याने वाहनचालकांना त्याचा अंदाज येणार नाही व मोठे अपघात होऊ शकतात, अशी शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे. खडकी हद्दीतून गेल्या दोन वर्षांपासून मेट्रोच्या कामामुळे एकेरी वाहतूक सुरू आहे. अरुंद रस्ते, बाजार परिसर यामुळे वाहतुककोंडीचा खडकीतील नागरिक, व्यापारी तसेच विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. याबाबत ''सकाळ''मधून वारंवार वृत्त प्रसिद्ध करून नागरिकांच्या समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला गेला. याच प्रकरणी ‘सकाळ’च्या पाठपुराव्याला यश आले व वाहतूक विभाग, कँटोन्मेंट बोर्ड व आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी पुढाकार घेत खडकी बाजार परिसराचा आढावा घेतला. त्यातून मेट्रो अधिकाऱ्यांशी बोलून दुभाजक घालण्याचे नक्की झाले. या निर्णयाचे खडकी व्यापारी वर्ग व नागरिकांनी स्वागतदेखील केले, मात्र प्रत्यक्षात हे काम सुरू झाल्यापासून वाहतुकीला अडथळा होत असून, दररोज किरकोळ अपघात होत आहेत.
--------------------
खडकीत दुहेरी वाहतूक सुरू होणार ही बाब स्वागतार्ह आहे, मात्र नागरिक व प्रशासनाचा समन्वय तसेच नियोजनाच्या अभावामुळे दुभाजक चुकीच्या ठिकाणी टाकले जात आहेत. ॲम्युनिशन फॅक्टरीच्या रस्त्यावर दुभाजक टाकण्याची आवश्यकता नव्हती उलट त्यामुळे तेथे वाहनकोंडी होण्याची शक्यता जास्त आहे. - ॲड. मुकेश शाह, स्थानिक रहिवासी
-----------------------

खडकी ः आंबेडकर रस्त्यावर दुभाजक घालण्याचे काम सुरू झाले असले, तरी सूचनाफलक नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.
-----------------------------

Web Title: Todays Latest Marathi News Kir22b00423 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top