दोन मुलांची हत्या करून दोन पर्यटकांची आत्महत्या रायगड जिल्ह्यातील आलीबाग येथील घटना; शिक्रापुरातून झाले होते बेपत्ता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दोन मुलांची हत्या करून दोन पर्यटकांची आत्महत्या
रायगड जिल्ह्यातील आलीबाग येथील घटना; शिक्रापुरातून झाले होते बेपत्ता
दोन मुलांची हत्या करून दोन पर्यटकांची आत्महत्या रायगड जिल्ह्यातील आलीबाग येथील घटना; शिक्रापुरातून झाले होते बेपत्ता

दोन मुलांची हत्या करून दोन पर्यटकांची आत्महत्या रायगड जिल्ह्यातील आलीबाग येथील घटना; शिक्रापुरातून झाले होते बेपत्ता

sakal_logo
By

अलिबाग, ता. १७ : दोन लहान मुलांची हत्या करून दोन पर्यटकांनी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना अलिबाग येथे मंगळवारी (ता. १७) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. कुणाल चिंतामण गायकवाड (वय २९) आणि प्रियांका संदीप इंगळे (वय २५), असे आत्महत्या केलेल्या पुरुष व महिलेचे नाव असून त्यांच्याबरोबर भक्ती (वय ५) व माऊली (वय ३) ही मुले मृतावस्थेत आढळली. ही मुले प्रियांकाची असल्याचे उघडकीस आले आहे.

भक्ती (वय ५) व माऊली (वय ३)
हे चौघेजण शिक्रापूर (जि.पुणे) येथून गेल्या बुधवारी (ता. ११) पर्यटनासाठी अलिबागच्या ‘ब्लॉसम कॉटेज’ येथे आले होते. विशेष म्हणजे २ मे रोजी दोन व्यक्ती बेपत्ता असल्याची तक्रार शिक्रापूर पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आली होती. आज दुपारपर्यंत कुणाचाही आवाज येत नसल्याने कॉटेजचे संचालक समीर पल्लवकर यांनी तपास केला असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. आत्महत्या केलेल्या पुरुष व महिलेच्या नातेवाइकांशी पोलिसांचा संपर्क झाला आहे. आत्महत्या केलेल्या पुरुष व महिलेचा नातेसंबंध काय होता, याचा तपास पोलिस करीत आहे.

पुणे ग्रामीण पोलिसांकडून या प्रकरणाच्या तपासासाठी मदत घेतली जात आहे. शवविच्छेदन आणि पुढील तपासातून घटनेचे कारण स्पष्ट होईल.
- अशोक दुधे, पोलिस अधीक्षक, रायगड

प्रेमप्रकरणातून प्रकार घडल्याचा अंदाज
शिक्रापूर : अलिबाग येथे येथे मृत आढळलेले चारही जण शिक्रापूर (ता. शिरूर) येथील आहेत. यातील मृत कुणाल गायकवाड याच्या पत्नीने, तर प्रियांका इंगळे हिच्या दोन मुलांसह तिघे बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या पतीने शिक्रापूर पोलिसांकडे दिली होती.
दरम्यान, प्रियांका व कुणाल या दोघांच्या प्रेमप्रकरणातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज शिक्रापूर पोलिसांनी व्यक्त केला आहे. असाच अंदाज रायगड पोलिसांनीही व्यक्त केल्याचे शिक्रापूर पोलिसांनी सांगितले. शिक्रापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जातेगाव बुद्रूक येथून कुणाल गायकवाड बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या पत्नीने दिली होती. तसेच मलठण फाटा परिसरातून प्रियांका इंगळे ही तिच्या भक्ती व माऊली या दोन मुलांसह बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या पतीने दिली होती. या चौघांचाही शोध घेताना त्यांचे मोबाईल लोकेशन रायगड दाखविल्याने शिक्रापूर पोलिसांचे एक पथक रायगडला रवानाही झाले होते, अशी माहिती पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Knd22b01361 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top