केंदूर-पाबळ गट गुणवंतांचा खजिना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केंदूर-पाबळ गट गुणवंतांचा खजिना
केंदूर-पाबळ गट गुणवंतांचा खजिना

केंदूर-पाबळ गट गुणवंतांचा खजिना

sakal_logo
By

शिक्रापूर, ता. २५ : ‘‘शिरूर तालुका पंचायत समितीचा सभापती दोन वर्षांपूर्वी होऊन गेलो असलो, तरी केंदूर-पाबळ जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावात केलेल्या विकासकामांमुळे आणि त्यानिमित्ताने मला मिळालेल्या प्रेमामुळे मी पूर्ण या गटाशी समरस झालो आहे. हा गट गुणवंतांचा खजिना असल्याने मला या गटाचा प्रचंड अभिमान आहे,’’ असे प्रतिपादन माजी सभापती सुभाष उमाप यांनी केले.
जातेगाव बुद्रुक (ता. शिरूर) येथे उमाप यांचा वाढदिवस त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांना मोठ्या जल्लोषात नुकताच साजरा केला. त्यावेळी ते बोलत होते. माजी आमदार सूर्यकांत पलांडे व पोपटराव गावडे, इतिहास अभ्यासक प्रा. श्रीमंत कोकाटे, माजी उपसभापती सविता पऱ्हाड व माजी जिल्हा परिषद सदस्या सविता बगाटे आदी यावेळी उपस्थित होते. उमाप म्हणाले, ‘‘आई-वडील आणि कर्तृत्ववान चार भाऊ यांच्यासह संपूर्ण गटाच्या पाठबळाने गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघातून पंचायत समितीत जाण्याची संधी मिळाल्याने मी सभापती झालो. पुढील काळात केंदूर-पाबळ गटातील जनभावना मी जिल्हा परिषदेत जाण्याच्या आहेत.’’
यावेळी शिरूर तालुक्यातील १०० शाळांमध्ये इयत्ता दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांसह मुख्याध्यापकांचे सन्मान केले. यावेळी मानसिंग पाचुंदकर, उद्योजक प्रमोद पऱ्हाड, परिसरातील गावांतील सरपंच-उपसरपंच व मान्यवर उपस्थित होते. बी. आर. रायसोनी यांनी सूत्रसंचालन केले.

वारे, थिटे व शिंदे यांचा सन्मान
या कार्यक्रमात राष्ट्रीय पुरस्कार विजेते मुख्याध्यापक दत्तात्रेय वारे यांचा विशेष सन्मान उमाप परिवाराचे वतीने करून जातेगाव बुद्रुकबरोबरच आता ते संपूर्ण राज्याचे भूषण असल्याचे सांगण्यात आले. याच कार्यक्रमात संभाजीराजे विद्यालयाचे प्राचार्य रामदास थिटे व मलठण येथील प्रा. अनिल शिंदे यांचा विशेष सत्कार माजी आमदार सूर्यकांत पलांडे यांचे हस्ते करण्यात आला.

Web Title: Todays Latest Marathi News Knd22b01398 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top