भिलवडीत चितळे डेअरीमध्ये विद्यार्थ्यांकडून सादरीकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भिलवडीत चितळे डेअरीमध्ये विद्यार्थ्यांकडून सादरीकरण
भिलवडीत चितळे डेअरीमध्ये विद्यार्थ्यांकडून सादरीकरण

भिलवडीत चितळे डेअरीमध्ये विद्यार्थ्यांकडून सादरीकरण

sakal_logo
By

भिलवडी, ता. ३ : येथील बी. जी. चितळे उद्योग समूहामध्ये ‘सकाळ एसआयआयएलसी’ अंतर्गत सुरू असलेल्या पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रॅम इन अॅग्री बिझनेस मॅनेजमेंटमधील पाच विद्यार्थ्यांच्या शिक्षण व योगदानाची परीक्षण चाचणी पार पडली.
यामध्ये सहा महिन्यांची इंटर्नशिप, म्हणजेच ‘लर्न अँड कॉन्ट्रीब्युट टू इंडस्ट्री’ या मॉडेलमधील पदवीधर विद्यार्थी एप्रिल ते सप्टेंबर २०२२ या कालावधीत चितळे उद्योगसमूहात डेअरी, फूड प्रोसेसिंग व संशोधन या विषयांमध्ये काम करीत होते. त्यांनी माहीत करून घेतलेल्या कौशल्यांचे व कंपनीला दिलेल्या योगदानाचे परीक्षण समितीसमोर सचित्र सादरीकरण केले. ‘एसआयआयएलसी’च्या या एक वर्षाच्या प्रोग्रॅममध्ये प्रत्यक्ष शिक्षणाबरोबर कंपनीला योगदान देताना सहा महिन्यांच्या कालावधीत दोन महिने शिक्षण व चार महिने प्रोजेक्टवर काम करणाऱ्यांमध्ये तन्मय चव्हाण, कल्याणी सस्ते, नितल पारेख, मिश्का कदम, निखिल पाटील यांचा समावेश होता. यावेळी त्यांनी प्रोजेक्ट सादर केले.
या वेळी चितळे डेअरीचे संचालक विश्वास चितळे, मकरंद चितळे, अतुल चितळे यांनी कृषी क्षेत्रात युवकांच्या यशस्वी वाटचालीसाठी मार्गदर्शन केले. आजचे हे परीक्षण, युवकांनी अवगत केलेली कौशल्ये व दिलेले योगदान भावी काळात मार्गदर्शक ठरणार असल्याचे सीईओ निनाद पानसे यांनी सांगितले. शिक्षण विभागाच्या प्रमुख डॉ. मंजूषा मोरे यांनी आभार मानले.