कासेगावजवळ अपघातात कुटुंबातील पाच ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कासेगावजवळ अपघातात कुटुंबातील पाच ठार
कासेगावजवळ अपघातात कुटुंबातील पाच ठार

कासेगावजवळ अपघातात कुटुंबातील पाच ठार

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
नेर्ले (जि. सांगली), ता. ४ : पुणे -बंगळूर महामार्गावर कासेगावजवळ येवलेवाडी फाटा (ता. वाळवा) येथे महामार्गाच्या बाजूला उभ्या असलेल्या कंटेनरला पुण्याहून येणाऱ्या मोटारीने पाठीमागून जोराची धडक दिली. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पाच जण ठार झाले. अंगाचा थरकाप उडवणारा अपघात काळीज हेलवणारा होता.
ठार झालेल्या कुटुंबातील तीन लहान मुलांचा समावेश आहे. हे कुटुंब जयसिंगपूरजवळील मौजे आगार (ता. शिरोळ) येथील आहे. मोटार चालक अरिंजय अण्णासाहेब शिरोटे (वय ३५), त्यांची वहिनी स्मिता अभिनंदन शिरोटे (३६), पूर्वा अभिनंदन शिरोटे (१४), सुनिशा अभिनंदन शिरोटे (९) व विरेन अभिनंदन शिरोटे (४) यांचा मृतांत समावेश आहे. पुणे येथून मौजे आगार येथे आपल्या घरी येताना हा अपघात झाला. कासेगाव पोलिस ठाण्यात घटनेची नोंद आहे. दरम्यान, कंटेनर चालक सुनीलकुमार शेशमल पांडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दुपारी अडीचच्या सुमारास कंटेनर (एमएच ०५, एएम ३६६४) येवलेवाडी (ता. वाळवा) येथे एका हॉटेलसमोर कोल्हापूरच्या दिशेला तोंड करून उभा होता. यावेळी पुण्याहून भरधाव वेगाने आलेल्या मोटारीने (एमएच १४, डीएन ६३३९) कंटेनरला पाठीमागून जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की यात अरिंजय व पूर्वा यांचा जागीच मृत्यू झाला. उर्वरित जखमींना तातडीने इस्लामपूरला हलवले; मात्र रुग्णालयात जाण्यापूर्वीच स्मिता, विरेन व सुनिशा यांचा मृत्यू झाला. महामार्गावरून जाणाऱ्या सहायक पोलिस निरीक्षक अविनाश मते यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.

काळीज पिळवटून टाकणारा अपघात
अपघातग्रस्त मोटारीचा चक्काचूर झाला. धडक इतकी भीषण होती की बोनेटचा भाग पाठीमागील काचेपर्यंत घासत आला होता. एअर बॅग उघडली जाऊनही कोणी वाचू शकले नाहीत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y64840 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top