मंचरला कालव्यात मोटार कोसळली पुण्यातील तिघांना वाचविण्यात यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंचरला कालव्यात 
मोटार कोसळली
पुण्यातील तिघांना वाचविण्यात यश
मंचरला कालव्यात मोटार कोसळली पुण्यातील तिघांना वाचविण्यात यश

मंचरला कालव्यात मोटार कोसळली पुण्यातील तिघांना वाचविण्यात यश

sakal_logo
By

मंचर, ता ९ : परिसरातील डिंभे धरणाच्या उजव्या कालव्यातील पाण्यात शनिवारी रात्री मोटार कोसळली. या मोटारीतील तिघांना पोलिस व नागरिकांनी तातडीने सुखरूप बाहेर काढले.
पवन महेश पाठक (वय ४१), शोभा महेश पाठक (वय ६१, दोघे रा. कोथरूड) आणि पुष्पा महावीर दुबे (वय ७६, मुळ रा. मध्य प्रदेश), हे भीमाशंकर येथून दर्शन घेऊन मोटारीने पुण्याकडे जात होते. मंचर परिसरात ते आले असता डिंभे उजव्या कालव्यात त्यांची मोटार कोसळली. त्यानंतर जवळच असलेल्या मोरडे फूड कंपनीतील कर्मचारी व पोलिस हवालदार तानाजी हगवणे, योगेश रोडे यांनी पाण्यात उतरून मोटारीतील तिघांनाही सुखरूप बाहेर काढले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. क्रेनच्या साह्याने रात्री साडेनऊ वाजता मोटार कालव्याच्या पाण्यातून काढण्यात आली.

Web Title: Todays Latest Marathi News Mac22b03455 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..