साईनाथ पतसंस्थेच्या सात नूतन संचालकांचे राजीनामे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साईनाथ पतसंस्थेच्या सात नूतन संचालकांचे राजीनामे
साईनाथ पतसंस्थेच्या सात नूतन संचालकांचे राजीनामे

साईनाथ पतसंस्थेच्या सात नूतन संचालकांचे राजीनामे

sakal_logo
By

मंचर, ता. १५ : येथील श्री साईनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत बिनविरोध निवड झालेल्या ११ संचालकांपैकी ७ जणांनी राजीनामे दिलेले आहेत. ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष गिरीश समदडीया यांना माघार घ्यावी लागली होती. त्यामुळे नाराज झालेल्या सात संचालकांनी ‘समदडीया नसतील तर आम्हालाही संचालकपदी राहायचे नाही’, अशी भूमिका घेऊन सहाय्यक निबंधक (सहकार) यांच्याकडे राजीनामे दिले आहेत.
पतसंस्था स्थापनेपासून गेली ३० वर्षे समदडीया हे संचालक पतसंस्थेचे अध्यक्ष आहेत. पतसंस्थेचे एक हजार ९०० सभासद असून ११५ कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. मंचर, पेठ, राजगुरुनगर व पाबळ येथे पतसंस्थेच्या शाखा आहेत. संचालक पदाच्या निवडणुकीनंतर झालेल्या घडामोडींत संजय जयवंतराव चव्हाण, सुदाम महादेव काळे, सगाजी भीमसेन पाटील, नंदकुमार दत्तात्रेय पडवळ, राजेंद्र भगवान थोरात, निलम अनिल पोखरकर, मीर मुरादआली या संचालकांनी राजीनामे दिले आहेत. ‘काहीजणांनी आडमुठेपणाची भूमिका घेऊन निवडणूक लावण्याचा प्रयत्न केला होता. समदडीया यांनी माघार घेतल्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली. हा प्रकार सभासदांना रुचला नाही. त्यामुळे आम्ही सात संचालकांनी राजीनामे दिले आहेत’, असे संजय चव्हाण यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mac22b03469 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..