खांडजला टाकीत गुदमरून चौघांचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खांडजला टाकीत गुदमरून चौघांचा मृत्यू
खांडजला टाकीत गुदमरून चौघांचा मृत्यू

खांडजला टाकीत गुदमरून चौघांचा मृत्यू

sakal_logo
By

माळेगाव, ता. १५ : खांडज (ता. बारामती) येथील आटोळे वस्तीत गोबरगॅसच्या सिमेंट टाकीची साफसफाई करताना शेतकरी कुटुंबातील चौघांचा गुदमरून मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये भानुदास अंबादास आटोळे (वय ५५), प्रवीण भानुदास आटोळे (वय २८), प्रकाश सोपान आटोळे (वय ३५) आणि बाबा पिराजी गव्हाणे(वय ५५, सर्व रा. खांडज, ता.बारामती) यांचा समावेश आहे. यातील भानुदास व प्रवीण हे पितापुत्र होते. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली व अपघातग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने बारामती शहरातील सरकारी सिल्व्हर ज्युबिली हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचारासाठी आणले. डॉक्टरांनी अपघातग्रस्तांना उपचार देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना संबंधितांचे जीव वाचविण्यात यश आले नाही.

याबाबत माळेगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किरण अवचर म्हणाले, ‘‘घराजवळील गोबरगॅसच्या सिमेंटच्या टाकीतील पाणी शेतात येत असल्याने टाकीच्या तळाशी काही घाण बसली आहे का, हे पाहण्यासाठी प्रथम प्रवीण आटोळे हे टाकीतमध्ये उतरले. त्यावेळी मलमूत्राचा विषारी वायू प्रवीण यांना सहन न झाल्याने ते बेशुद्धावस्थेत खाली कोसळले. ते पाहून वडील भानुदास आटोळे हेही घाई गडबडीत टाकीत उतरले. त्यापाठोपाठ प्रकाश आटोळे आणि बाबा गव्हाणे हेही त्यांच्या मदतीला उतरले असता चौघेही बेशुद्ध झाले. त्यावेळी जेसीबी मशिन बोलावून ही सिमेंट टाकी फोडली व प्रसाद लोळे यांनी इतरांच्या मदतीने अपघातग्रस्त शेतकऱ्यांना बाहेर काढले. या प्रकरणी नानासाहेब बाबूराव आटोळे यांनी माळेगाव पोलिस ठाण्यात खबर दिली असून, पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

फोटो
भानुदास आटोळे - ०१५६०
प्रवीण आटोळे - ०१५६२
प्रकाश आटोळे - ०१५६४
बाबा गव्हाणे - ०१५६१