आंबी तलावाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंबी तलावाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण
आंबी तलावाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण

आंबी तलावाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण

sakal_logo
By

मोरगाव, ता. २४ : आंबी पाटी (ता. बारामती) येथील पाझर तलावाच्या दुरुस्तीचे काम नुकतेच पूर्ण झाले असून, याचा पावसाळ्यात निश्चित फायदा शेतकऱ्यांना होणार असल्याचे सरपंच प्रवीण शिर्के यांनी सांगितले.

मोरगाव, आंबी बुद्रुक, जोगवडी या तीन गावांतील शेतकऱ्यांसाठी हा तलाव महत्त्वाचा आहे. याचे अडीच एकर क्षेत्र असून, याचा परिसरातील विहिरींना गेली अनेक वर्षांपासून जलस्रोत बळकटीकरणासाठी तलावाचा फायदा होत आहे. या तलावातून पाण्याची गळती होत होती तसेच तलावात काटेरी झाडेही वाढली होती. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे तलाव दुरुस्तीसाठी पंधरा लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला होता.

भरावाचे बळकटीकरण
तलावातील काटेरी झुडुपे काढून त्यामध्ये काळी माती भरण्यात आली आहे. तर भरावाला दगडी पिचिंग करून त्याचे बळकटीकरण करण्यात आले आहे. या माध्यमातून तलावाचे सुशोभीकरणही झाले असून, पावसाळ्यात येथील पाण्याची साठवण क्षमता वाढण्यासही यामुळे मदत होणार आहे. भराव बळकटीकरणामुळे पाण्याची गळती थांबून तलावात दीर्घकाळ पाणी साठण्यास मदत होणार आहे. या तलावाची पाण्याची साठवण क्षमता ११३ घनमीटर आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mor22b00487 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top