अजिंक्य रहाणेकडे पश्‍चिम विभागाचे नेतृत्व | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अजिंक्य रहाणेकडे पश्‍चिम विभागाचे नेतृत्व
अजिंक्य रहाणेकडे पश्‍चिम विभागाचे नेतृत्व

अजिंक्य रहाणेकडे पश्‍चिम विभागाचे नेतृत्व

sakal_logo
By

मुंबई, ता. २४ ः दुलिप करंडकासाठी पश्‍चिम विभागीय संघाची घोषणा बुधवारी करण्यात आली. ‘आयपीएल’मध्ये दुखापत झाल्यामुळे क्रिकेटपासून दूर राहणारा अजिंक्य रहाणे फिट झाला असून त्याची ‍पश्‍चिम विभाग संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. दुलिप करंडक ८ ते २५ सप्टेंबर यादरम्यान तमिळनाडू येथे होणार आहे.
पश्‍चिम विभागाच्या संघात अजिंक्यसह पृथ्वी शॉ, यशस्वी जैसवाल, श्रेयस अय्यर, हार्दिक तामोरे, शम्स मुलाणी, तनुष कोटियन, शार्दूल ठाकूर या मुंबईकरांचा समावेश आहे. तसेच राहुल त्रिपाठी हा महाराष्ट्राचा खेळाडूही त्या संघात आहे. सौराष्ट्राचा अनुभवी खेळाडू जयदेव उनाडकट यालाही संघात स्थान मिळाले आहे.

मध्य प्रदेशच्या खेळाडूंना स्थान
मध्य विभागीय संघाचीही घोषणा या वेळी करण्यात आली. मध्य प्रदेशने मागील मोसमात रणजी करंडक जिंकला. या संघातील बहुतांशी खेळाडूंना मध्य विभागीय संघात स्थान देण्यात आले आहे. यश दुबे, शुभम शर्मा, कुमार कार्तिकेय व व्यंकटेश अय्यर यांचा या संघात समावेश आहे. या संघाचे नेतृत्व करण शर्माकडे सोपवण्यात आले आहे.

पश्‍चिम विभागाचा संघ ः अजिंक्य रहाणे (कर्णधार, मुंबई), पृथ्वी शॉ (मुंबई), यशस्वी जैसवाल (मुंबई), श्रेयस अय्यर (मुंबई), हार्दिक तामोरे (मुंबई), शम्स मुलाणी (मुंबई), तनुष कोटियन (मुंबई), शार्दूल ठाकूर (मुंबई), राहुल त्रिपाठी (महाराष्ट्र), सत्यजित बच्छाव (महाराष्ट्र), हित पटेल (गुजरात), चिंतन गझा (गुजरात), जयदेव उनाडकट (सौराष्ट्र), चिराग जानी (सौराष्ट्र), अतित सेठ (बडोदा).
मध्य विभागाचा संघ ः करण शर्मा (कर्णधार), शुभम शर्मा (उपकर्णधार), हिमांशू मंत्री, यश दुबे, प्रियम गर्ग, रिंकू सिंग, अशोक मेनरिया, अक्षय वाडकर, गौरव यादव, व्यंकटेश अय्यर, दीपक धोपाला, अनिकेत चौधरी, कुमार कार्तिकेय, आदित्य सरवटे, अंकित राजपूत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94369 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..