लिजंड पेले यांची कामगिरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लिजंड पेले यांची कामगिरी
लिजंड पेले यांची कामगिरी

लिजंड पेले यांची कामगिरी

sakal_logo
By

महान फुटबॉलपटू लिजंड पेले १६ वर्षांचे असताना १९५७ मध्ये त्यांनी अर्जेंटिनाविरुद्ध राष्ट्रीय पदार्पणातच गोल केला. पुढच्याच वर्षी झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेत ब्राझीलने यजमान स्वीडनचा पराभव करून पहिले वहिले विश्वकरंडक विजेतेपद मिळवले, त्या संपूर्ण स्पर्धेत पेले यांनी सहा गोल केले.


- पेले यांनी ब्राझीलकडून ७७ गोल केले. या व्यतिरिक्त प्रथम श्रेणीत १२८३ गोलांचे योगदान दिले.
- पेले यांनी ब्राझीलला तीन विश्वकरंडक जिंकून दिले.
- पेले हे नाव अमेरिका शास्त्रज्ञ थॉमस एडिसन यांच्या नावावरून पडले. त्यांचे खरे नाव एडसन अरांतेस डो नॅसिमेंटो हे आहे.
- पेले हे १५ वर्षांचे असताना त्यांनी सँटोस हा क्लब जॉईन केले. १९५६ मध्ये ते पहिला क्लब सामना खेळले. त्यात त्यांनी चार गोल केले.
- वयाच्या १७ व्या वर्षी विश्वकरंडक जिंकणारे सर्वात कमी वयाचे फुटबॉलपटू पेले ठरले. त्यांनी अंतिम सामन्यात यजमान स्वीडनविरुद्ध दोन गोल केले.
- १९ नोव्हेंबर १९६९ रोजी त्यांनी आपल्या कारकिर्दीतील एक हजारावा गोल केला. त्यानिमित्ताने सँटोस या क्लबने हा दिवस ‘पेले दिवस’ म्हणून साजरा केला.
- पेले यांनी १९७० च्या विश्वकरंडक स्पर्धेत इटलीविरुद्ध आपला आंतरराष्ट्रीय १०० वा गोल केला.
- १९९३ मध्ये पेले यांना राष्ट्रीय फुटबॉल हॉलचा सन्मान दिला.
- पेले असे एकमेव खेळाडू आहे ज्यांनी सर्वाधिक तीन विश्वकरंडक जिंकले आहेत.
- १९९५ मध्ये पेले यांना ब्राझीलचे क्रीडा मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले. १९९८ पर्यंत ते या पदावर कायम होते.
- १९९७ मध्ये त्यांना ब्रिटिश नाईडहुड हा पुरस्कार दिला.
- १९९९ मध्ये पेले यांना आंतरराष्ट्रीय ऑलिंपिककडून शतकातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरविले.

पेले वर्ल्डकपमध्ये....
- १९५८ ः ४ सामने ः ६ गोल
- १९६२ ः २ सामने ः १ गोल
- १९६६ ः २ सामने ः १ गोल
- १९७० ः ६ सामने ः ४ गोल
(या चारही विश्वकरंडक सामन्यात त्यांना एकही यलो किंवा रेड कार्ड मिळाले नाही)

पेले यांची कारकीर्द
क्लब आणि देश सामने गोल
सँतोस ६६० ६४३
न्यूयॉर्क कस्टम्स ६४ ३७
ब्राझील ९२ ७७
मिलिट्री टीम ४ ४
साओ पावलो चाचणी स्पर्धा १५ १२
इतर चाचणी स्पर्धा ५ २
एकूण ८४० ७७५

विक्रमादित्य पेले
- ब्राझीलकडून सर्वाधिक गोल ः ७७
- सँतोस क्लबकडून सर्वाधिक गोल ः ६४३
- आंतरखंडीय करंडक स्पर्धेत सर्वाधिक गोल ः ७
- जागतिक फुटबॉलमध्ये सर्वाधिक हॅटट्रिक ः ९२
- कारकिर्दीत सर्वाधिक गोल (मैत्रीपूर्ण सामन्यासह) ः १२८३
- सर्वाधिक विश्वकरंडक जिंकणारे खेळाडू ः ३
- सर्वात लहान विश्वकरंडक विजेते खेळाडू ः १७ वर्षे २४९ दिवस
- विश्वकरंडक स्पर्धेत गोल करणारे सर्वात लहान खेळाडू ः १७ वर्षे, २३९ दिवस
- विश्वकरंडक स्पर्धेत हॅटट्रिक करणारे सर्वात लहान खेळाडू ः १७ वर्षे २४४ दिवस
- विश्वकरंडक स्पर्धेचा अंतिम सामन खेळणारे सर्वात लहान खेळाडू ः १७ वर्षे २४९ दिवस
- विश्वकरंडक स्पर्धेत इतरांच्या गोलासाठी सर्वाधिक सहाय्य (असिस्ट) करणारे खेळाडू ः १०
- एकाच विश्वकरंडक स्पर्धेत गोलासाठी सर्वाधिक सहाय्य ः ६
- विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सर्वाधिक गोल ः ३
- एकाच वर्षात (कॅलेंडर इयर) सर्वाधिक गोल ः १२७