घरफोड्या करणारी सुमो गॅंग जेरबंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घरफोड्या करणारी सुमो गॅंग जेरबंद
घरफोड्या करणारी सुमो गॅंग जेरबंद

घरफोड्या करणारी सुमो गॅंग जेरबंद

sakal_logo
By

घरफोड्या करणारी
सुमो टोळी जेरबंद

नारायणगाव,ता.७ : नगर व पुणे जिल्ह्यातील बसस्थानक परिसरात प्रवाशांना लुटणारी व दिवसा घरफोड्या करणारी पाच जणांच्या सुमो टोळीला नारायणगाव पोलिसांनी जेरबंद केले. या टोळीत तीन महिलांचा समावेश आहे. आरोपींकडून बारा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, सुमो मोटार व रोख रक्कम असा आठ लाख ऐंशी हजार रुपयांचा ऐवज जप्त केल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.
याप्रकरणी संजय भानुदास सकट, नंदा भानुदास सकट (रा. इंदिरा नगर, श्रीरामपूर), दिगंबर सूर्यभान दारकुंडे, लीलाबाई भोलानाथ खंदारे, रखमाबाई अचपल खंदारे (सर्व रा. सलाबतपूर, ता.नेवासा, जि नगर) यांना अटक केली आहे. नारायणगाव परिसरात मागील आठवड्यात येथील खोडद रोड, कोल्हे मळा रोड परिसरात भर दिवसा बंद सदनिकेचा कडी कोयंडा तोडून चोरीच्या घटना झाल्या होत्या. या घरफोडीशी नगर जिल्ह्यातील सुमो टोळीचा संबंध असल्याची माहिती नारायणगाव पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे नारायणगाव पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक ताटे, फौजदार विनोद धुर्वे, धनंजय पालवे, दत्ता ठोंबरे, शैलेश वाघमारे, सचिन कोबल व जायभावे यांच्या पथकाने नगर येथे जाऊन सुमोसह आरोपींना अटक केली.

Web Title: Todays Latest Marathi News Nar22b01293 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top