शेटफळ तलाव बचाव कृती समितीच्या सदस्यांचा सन्मान

शेटफळ तलाव बचाव कृती समितीच्या सदस्यांचा सन्मान

नीरा नरसिंहपूर, ता. ८ : शेटफळ तलाव बचाव कृती समितीने शेटफळ तलावावरील बेकायदेशीर पाणी परवाने रद्द करण्यासाठी दिलेल्या लढ्याला यश आले. त्यानिमित्त पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांनी समितीच्या सदस्यांचा सन्मान केला.
शेटफळ तलाव बचाव कृती समितीचे कार्याध्यक्ष महादेवराव घाडगे यांच्या बावडा येथील निवासस्थानी समितीच्या हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी जगदाळे यांच्या हस्ते पंडित पाटील, महादेवराव घाडगे, अजित टिळेकर, विजय गायकवाड यांचा फेटा, शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. शेटफळ तलावातून जलसंपदा विभागाने ४४ जणांना उचल पाणी परवाने दिले हाते. यासाठी शेटफळ तलाव बचाव कृती समितीने चार वर्ष लढा दिला. त्याला यश प्राप्त झाल्याने दहा गावातील शेती सिंचनाचा प्रश्न निकाली निघाला. याबद्दल समितीच्या सदस्यांचा सन्मान करण्यात आला. दरम्यान, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आप्पासाहेब जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली घवघवीत यश संपादन केल्याबद्दल त्यांचा सत्कार घाडगे कुटुंबीयांच्या वतीने अंकुश घाडगे, शंकर घाडगे, रणजित घाडगे यांच्या वतीने करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com