सद्‍भावनेतून शांती शक्य पाकिस्तानातील अनुभव आशावादी असल्याचे गांधी शांतियात्रेतील युवकांचे प्रतिपादन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सद्‍भावनेतून शांती शक्य 
पाकिस्तानातील अनुभव आशावादी असल्याचे गांधी शांतियात्रेतील युवकांचे प्रतिपादन
सद्‍भावनेतून शांती शक्य पाकिस्तानातील अनुभव आशावादी असल्याचे गांधी शांतियात्रेतील युवकांचे प्रतिपादन

सद्‍भावनेतून शांती शक्य पाकिस्तानातील अनुभव आशावादी असल्याचे गांधी शांतियात्रेतील युवकांचे प्रतिपादन

sakal_logo
By

कोथरूड, ता. २६ : पाकिस्तानात जातोय पण ते तुझा खिमाच करतील, असे सांगून लोक मला घाबरवत होते पण आम्ही प्रेम सद्‍भावना घेऊन गेलो होतो. तेथे आम्हाला भरभरून प्रेमच मिळाले, असा अनुभव पाकिस्तानात गांधी शांतियात्रा करून भारतात परतलेल्या विश्वामित्र योगेश यांनी सांगितला.

महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दल आयोजित शांतीदूत संवाद कार्यक्रमात एस. नितीन, विश्वामित्र योगेश, जालंदरनाथभाई या तीन शांतीदूतांशी गांधी भवन येथे संवाद आयोजित करण्यात आला होता. या वेळी युक्रांदचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी, अरुण खोरे, संदीप बर्वे, ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे, सचिन पांडुळे, डॉ. प्रवीण सप्तर्षी, सुदर्शन चखाले, नीलम पंडित, श्याम तोडकर, डॉ. ऊर्मिला सप्तर्षी, रोहनसिंह गायकवाड, आदित्य आरेकर, अजय नेमाने, ओंकार आमटे, अभिजित मंगल आदी उपस्थित होते.

एस. नितीन म्हणाले की, पाकिस्तानातील ज्येष्ठ फाळणीच्या जखमा धरून बसले असले तरी तरुण मात्र उत्साही आहेत. एका धर्मगुरुने सांगितले की, आम्हाला खूपच चुकीची माहिती दिली गेली. त्यामुळे आमचे माथे भडकले होते पण सत्य समजल्यावर मन शांत झाले. आता मी धर्मगुरू म्हणून माझे काम करताना शांततेचा संदेश देतो. जालंदरनाथभाई यांनी सांगितले की, पाकिस्तानची नाळ भारताशी जोडली गेली आहे. मुठभर कट्टरतावादी द्वेष पसरवू इच्छितात पण बहुसंख्य लोक सौहार्दाचे नाते टिकवू इच्छित आहेत. परस्पर देशांत प्रवास करून संवाद वाढवला, एकमेकांना समजून घेतले तर द्वेषाच्या भावना गळून पडतील.

मैत्रीचे झाड
एस. नितीन यांनी या वेळी आंब्याचे रोपाचा किस्सा सांगितला, ‘‘जय जगत हे मिशन घेऊन आम्ही पाकिस्तानात गेलो होतो. तेथील इर्शादभाईने आम्हाला आंब्याचे झाड दिले. मात्र, जकात अधिकाऱ्यांनी सांगितले की, झाड, बियाणे नेता येत नाहीत. त्यामुळे कीटकनाशके वा विषाणूचा फैलाव होवू शकतो. भारत व पाकिस्तानातील नैसर्गिक वातावरण, परिसंस्था यांमध्ये फारसा फरक नाही. त्यामुळे तुम्ही समजता असे काही होणार नाही हे आम्ही पटवून दिले. सुरुवातीला विरोध करणाऱ्या त्या अधिकाऱ्यांनी आमचा चांगला हेतू ओळखून आम्हाला झाड नेण्यास परवानगी दिली. अनेक अडथळ्यांवर मात करत हे झाड आम्ही भारतात आणले. आंब्याचे हे झाड भारत पाकिस्तान मैत्रीचे प्रतीक म्हणून सासवडमधील गराडे येथे वाढत आहे.’’

Web Title: Todays Latest Marathi News Pau22b04674 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..