कोथरूड येथे मंत्री सत्तार यांचा निषेध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोथरूड येथे मंत्री सत्तार यांचा निषेध
कोथरूड येथे मंत्री सत्तार यांचा निषेध

कोथरूड येथे मंत्री सत्तार यांचा निषेध

sakal_logo
By

कोथरूड, ता. ९ : मंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस व पतित पावन संघटनेच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.

महिलेंबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांविरोधात तीव्र आंदोलन केले जाईल असे निवेदन पतित पावन संघटनेचे श्रीकांत शिळीमकर, मनोज नायर, पप्पू टेमघरे, गोकूळ शेलार, राहुल पडवळ, ज्ञानेश्वर साठे, सुनील मराठे, अण्णा बाबर, दीपक काळभोर यांनी कोथरूड पोलिसात दिले.
राष्ट्रवादी युवक काँग्रेस कोथरूड विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष गिरीश गुरनानी, केदार कुलकर्णी, सुनील हरळे यांनी कोथरूड पोलिसांकडे कॅबिनेट मंत्री सत्तार यांच्यावर कलम ५०४, ५०५ व २६८ नुसार गुन्हा नोंदविण्यात यावा अशी मागणी केली आहे.