डॉ. स्नेहल धोंदे यांची रामनदीला भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डॉ. स्नेहल धोंदे यांची रामनदीला भेट
डॉ. स्नेहल धोंदे यांची रामनदीला भेट

डॉ. स्नेहल धोंदे यांची रामनदीला भेट

sakal_logo
By

कोथरूड, ता. ९ : बावधनला रामनदी काठी होणाऱ्या कचरा प्रकल्पामुळे नदी प्रदूषण होईल ही भूमिका घेत उच्च न्यायालयात लढा देणाऱ्या जलबिलादरीच्या डॉ. स्नेहल धोंदे यांनी रामनदीची पाहणी केली.

नदीकाठी कचरा डेपो करू नये या मागणीसाठी जलबिलादरीच्यावतीने डॉ. स्नेहल धोंदे यांनी उच्च न्यायालयात दावा दाखल केला होता. त्याची पुढील सुनावणी शुक्रवारी (ता. ११) नोव्हेंबर रोजी होणार आहे. तोपर्यंत या ठिकाणी कोणतेही बांधकाम करता येणार नाही असा आदेश न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे नदी वाचवा आंदोलनातील सहभागींना दिलासा मिळाला आहे.

डॉ. धोंदे यांनी पुण्यात येऊन रामनदी काठी सुरु असलेल्या कचरा डेपोची पाहणी केली. यावेळी डॉ. धोंदे यांनी रामनदीच्या पाण्याचे विविध ठिकाणाहून नमुने घेतले. पर्यावरण कार्यकर्ते किशोर मोहोळकर यांनी त्यांना रामनदी काठी होत असलेल्या कचरा डेपो विरुद्ध लढ्याची माहिती दिली. त्याच बरोबर त्यांनी भुगांव व भुकूम येथील ग्रामस्थ व पर्यावरण कार्यकर्त्यांना नदीचे महत्त्व, सरकारी योजना तसेच नागरिकांनी नदी संवर्धनात कसा सहभाग घेतला पाहिजे याचे मार्गदर्शन केले.

धोंदे यांनी रामनदीच्या उगम स्थळी खाटपेवाडी तलावाला तसेच भुकूम येथील सोमेश्वर मंदिरातून पुढे जाणाऱ्या रामनदीची व कोथरूड कचरा डेपोची पाहणी केली. स्थानिक लोकप्रतिनिधी माजी नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.