मामासाहेब मोहोळ महाविद्यालयात शरद करंडक नाट्य अभिनय स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मामासाहेब मोहोळ महाविद्यालयात
शरद करंडक नाट्य अभिनय स्पर्धा
मामासाहेब मोहोळ महाविद्यालयात शरद करंडक नाट्य अभिनय स्पर्धा

मामासाहेब मोहोळ महाविद्यालयात शरद करंडक नाट्य अभिनय स्पर्धा

sakal_logo
By

कोथरूड, ता. २६ : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मामासाहेब मोहोळ महाविद्यालय, पौड रोड येथे पद्मभूषण शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ‘शरद करंडक राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन नाटय अभिनय स्पर्धा’ संपन्न झाल्या. कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे खजिनदार अॅड. मोहनराव देशमुख यांच्या हस्ते झाले. स्पर्धेत विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मूक अभिनय, सांघिक प्रयोग व एकपात्री प्रयोग सादर केले.
प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय, आकुर्डी या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘स्त्री - अत्याचार’ या विषयावर नाटक सादर केली. ‘स्त्री ही अबला नसून सबला आहे व तिच्यामध्ये अन्यायाविरुद्ध लढण्याची क्षमता असते’ हा संदेश त्यांनी नाटकातून दिला. प्राचार्य डॉ. गंगाधर सातव यांनी स्वागत केले. या स्पर्धेसाठी प्रसिद्ध चित्रपट निर्माते, लेखक सुश्रुत भागवत, नाटय कलाकार किरण ढमाले व विकास साठे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. बक्षिस वितरण कार्यक्रमास लीड मीडिया ग्रुपचे संचालक विनोद सातव पाहुणे म्हणून उपस्थित होते. संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. सूत्रसंचालन डॉ. रूपाली शेंडकर, प्रा. अमृता मोरे व प्रा. स्मिता चव्हाण यांनी केले. आभार प्रा. वैशाली कदम यांनी मानले.