खगोलशास्रज्ञ बनून देशाचे नाव उज्वल करा ः प्रा. कुंभारे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खगोलशास्रज्ञ बनून देशाचे
नाव उज्वल करा ः प्रा. कुंभारे
खगोलशास्रज्ञ बनून देशाचे नाव उज्वल करा ः प्रा. कुंभारे

खगोलशास्रज्ञ बनून देशाचे नाव उज्वल करा ः प्रा. कुंभारे

sakal_logo
By

कोथरूड, ता. २७ ः ‘‘केळेवाडीसारख्या वस्ती भागात असलेल्या विद्यालयात अत्याधुनिक दुर्बिणी उपलब्ध झाल्या आहेत. या संधीचे सोने करा. खगोलशास्रज्ञ बनून देशाचे नाव उज्वल करा, ’’असे आवाहन ग्लोबल मिशन ॲस्ट्रॉनॉमी अँड रिसर्च सेंटरचे संचालक प्रा. विशाल कुंभारे यांनी केले.

हेंकल इंडिया व लायन्स क्लब ऑफ पुणे २१ सेंच्युरी या क्लबच्या वतीने पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ, शिक्षण प्रसारक मंडळाच्या सौ. प्रतिभा पवार विद्यामंदिरमध्ये सुसज्ज अशा अवकाश निरीक्षण केंद्राची स्थापना करण्यात आली. यावेळी लायन्स गॅलिलिओ ॲस्ट्रॉनॉमी लॅबचे उद्‍घाटन करताना ते बोलत होते.
हेंकल इंडियाचे व्यवस्थापक भूपेश सिंग, डॉ. प्रसाद खंडागळे, लायन्स क्लब ऑफ पुणे २१सेंच्युरीच्या अध्यक्षा प्रतिभा खंडागळे, लायसन्सचे माजी प्रांतपाल डॉ. चंद्रहास शेट्टी, मुख्याध्यापक श्याम धुमाळ, माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका नीलिमा खोंडे, अर्ली बर्ड्स इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका स्वाती पवार, परमानंद शर्मा, सुनील चेकर व्यासपीठावर उपस्थित होते.

कुंभारे म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांमध्ये खगोलशास्त्राची आवड निर्माण व्हावी आणि अवकाशासंबंधी अनेक प्रश्नांची उत्तरे त्यांना अवकाश निरीक्षण करून स्वतः शोधता यावीत, या हेतूने उच्च दर्जाचे लेन्स असणारे टेलिस्कोप, बायनोक्युलर, अनेक प्रकारचे पोस्टर्स, ॲस्ट्रॉनॉमी डॉक्युमेंटरी, सॉफ्टवेअर, अवकाश निरीक्षणासाठी आवश्यक सर्व साहित्य आणि अवकाशासंबंधी मार्गदर्शन करणारी अनेक प्रकारची पुस्तके या ॲस्ट्रॉनॉमी लॅबमध्ये विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिली आहेत. विद्यार्थ्यांनी या प्रयोगशाळेचा लाभ घेऊन स्वतःची निरीक्षणे नोंदवावीत, त्याची चिकित्सा करून समाजापुढे स्वतःचे संशोधन मांडावे.’’
या ॲस्ट्रॉनॉमी लॅब मधून विद्यार्थ्यांना ग्रह, तारे, सूर्यमाला, तेजोमेघ, आकाशगंगा, ग्रहणे अशा अनेक गोष्टी शिकता येणार आहेत. तसेच येथून विद्यार्थ्यांची खगोलशास्त्रज्ञ बनण्याची पायाभरणी होईल, असे डॉ. प्रसाद खंडागळे यांनी सांगितले.

ॲस्ट्रॉनॉमी लॅबचे नियोजन, मांडणी व संचलन ग्लोबल मिशन ॲस्ट्रॉनॉमी अँड रिसर्च सेंटरचे संचालक प्रा. विशाल कुंभारे यांनी केले. तसेच पुढील प्रशिक्षणाचे काम यांच्याच मार्गदर्शनाखाली होणार आहे. या वेळी मालन देवरे, सतीश राजहंस, सतीश देवरे, यश पंडित, माधुरी पंडित आधी लायन्स क्लबचे पदाधिकारी, हेंकलचे कीर्तिकुमार काटकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण रोजटकर, प्रा. मीनाक्षी मेमाणे यांनी केले, तर आभार नारायण शिंदे यांनी मानले.
फोटो