मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त व्याख्यान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मराठी राजभाषा गौरव 
दिनानिमित्त व्याख्यान
मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त व्याख्यान

मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त व्याख्यान

sakal_logo
By

कोथरूड, ता. २७ : मुक्ताई सुतार माध्यमिक विद्यालयात कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी राजभाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. साहित्यिक वि.दा.पिंगळे यांचे व्याख्यान आयोजित केले होते. शाळेतील विद्यार्थ्यांनी कथा, नाटक, पोवाडा, अभंग,गवळणी असे विविध कार्यक्रम सादर केले. वि .वा .शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. या कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका मीना आंधळे, ज्येष्ठ शिक्षक डॉ. शांताराम डफळ यांनी विद्यार्थ्यांना मराठी दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे आयोजन मराठी विषय शिक्षक संजय पिंगळे, अंजली जोशी, जयश्री फेंगसे यांनी केले.