कोथरूडमध्ये शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोथरूडमध्ये शिवजन्मोत्सव 
उत्साहात साजरा
कोथरूडमध्ये शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा

कोथरूडमध्ये शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा

sakal_logo
By

कोथरूड, ता. १३ : शिवसाई युथ फाउंडेशनच्यावतीने आयोजित केलेला शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्री सद्‌गुरू कला क्रीडा शिवकालीन युद्ध कला ग्रुपच्या मर्दानी खेळाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. युवा शाहीर श्रीकांत शिर्के यांनी पोवाडा गायन केले. उपस्थित महिलांनी शिवजन्माचा पाळणा गायला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दर्शन पगडे, ओमकार जाधव, संकेत पवार, अनिकेत सकटे, सौरभ खरात, कुणाल मोरे, मनोज कळंबे, विजय कुडले, जयेश अरगडे, गौरव मैड, वैभव खत्री, ज्ञानेश शिंदे यांनी मेहनत घेतली. नीरज कुटेकर यांनी सूत्रसंचालन केले. फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष साईराज पगडे यांनी कार्यक्रमाला संबोधित केले.