लोकमान्य संघातर्फे हास्यदिन उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लोकमान्य संघातर्फे हास्यदिन उत्साहात
लोकमान्य संघातर्फे हास्यदिन उत्साहात

लोकमान्य संघातर्फे हास्यदिन उत्साहात

sakal_logo
By

कोथरूड, ता. १५ : दरवर्षी मे महिन्यातील पहिल्या रविवारी जागतिक हास्यदिन साजरा केला जातो. लोकमान्य हास्ययोग संघाच्या वतीने डेक्कन येथील पुनम सभागृहात हास्यदिनाचा कार्यक्रम पार पडला.
प्रमुख पाहुणे म्हणून कलाकार विजय गोखले आणि विघ्नेश जोशी उपस्थित होते. पाहुण्यांचा परिचय अनुराधा भांडारकर यांनी करून दिला. लोकमान्य हास्ययोग संघाचे अध्यक्ष डॉ. प्रसाद आंबीकर यांनी प्रास्ताविक केले. पाहुण्यांचा सत्कार डॉ. आंबीकर आणि बंडोपंत फडके यांनी केला. या वेळी विठ्ठल काटे, मकरंद टिल्लू, मधुकर पवार, जयंत मुळे आदी उपस्थित होते. संघाच्या सचिव पुष्पा भगत यांनी आभार मानले.