Thur, October 5, 2023

‘मनविसे’च्या शहरातील पहिल्या शाखेचे उद्घाटन
‘मनविसे’च्या शहरातील पहिल्या शाखेचे उद्घाटन
Published on : 25 May 2023, 2:23 am
कोथरूड, ता. २५ ः महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात सुरु केलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पुणे शहरातील पहिल्या शाखेचे उद्घाटन मनसे सरचिटणीस ॲड. किशोर शिंदे, महिला सेना पुणे शहराध्यक्षा वनिता वागस्कर यांच्या हस्ते करण्यात आले. संयोजन शशांक अमराळे यांनी केले होते. या वेळी प्रशांत कनोजिया, आशिष साबळे, सचिन पवार, सारंग सराफ, संजय काळे, गणेश शिंदे, सचिन विप्र, महेश देवळेकर, आनंद पाटील, श्रीकांत अमराळे, रोहित मोकाटे, शुभम चोरघे, किरण जोशी आदी उपस्थित होते.