सूचना आल्यानंतर तातडीने लसीकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सूचना आल्यानंतर तातडीने लसीकरण
सूचना आल्यानंतर तातडीने लसीकरण

सूचना आल्यानंतर तातडीने लसीकरण

sakal_logo
By

पुणे, ता. ४ : शहरातील ६ ते ११ वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणाच्या सूचना आलेल्या नाहीत. त्यामुळे लसीकरणाची सर्व तयारी सज्ज झाली आहे. सूचना आल्यानंतर तातडीने लसीकरण सुरू करण्यात येईल, असा विश्वास पुणे महापालिकेतर्फे व्यक्त करण्यात आला.
पुण्यात चार लाख पाच हजार मुलांना लस देण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. त्यांना कोव्हॅक्सिन लस देण्यात येणार आहे. त्याबाबत केंद्र सरकारने यापूर्वी निर्णय घेतला आहे. मात्र, या बाबतच्या सूचना अद्यापही देण्यात आलेल्या नाहीत.
शहरात ४२ लाख नागरिक राहतात. या प्रमाणात ९.६८ टक्के लोकसंख्या ६ ते ११ वर्षे वयोगटातील आहेत. त्या बाबतच्या सूचना केंद्र आणि राज्य सरकारने दिल्या आहेत. त्यामुळे लसीकरण सुरू झाल्यानंतर महापालिकेच्या रुग्णालयातून या मुलांना लस देण्याची व्यवस्था पूर्ण करण्यात आली आहे, असे पुणे महापालिकेचे लसीकरण प्रमुख डॉ. सूर्यकांत देवकर यांनी सांगितले.

बूस्टर डोसला ज्येष्ठांचा सर्वाधिक प्रतिसाद
शहरातील दोन लस घेतलेल्या नागरिकांसाठी बूस्टर डोस महापालिकेतर्फे उपलब्ध केला आहे. शहरातील एक लाख ७७ हजार नागरिकांनी हा तिसरा म्हणजेच बूस्टर डोस घेतला आहे. त्यापैकी एक लाख २४ हजार हे ज्येष्ठ नागरिक आहेत. कोरोना प्रतिबंधक लशीचा दुसरा डोस घेऊन नऊ महिने पूर्ण झालेल्या नागरिकांना बूस्टर डोस देण्यात येत आहे. यात १८ ते ४५ वयोगटात दोन हजार ३८३ नागरिकांचा समावेश आहे. ४५ ते ६० वयोगटातील नऊ हजार ६८६ आणि ६० आणि ६० पेक्षा जास्त वयोगटातील एक लाख २४ हजार लाभार्थी आहेत.

.

Web Title: Todays Latest Marathi News Pct22b12753 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top