पुण्यात मोबाईल चोरांचा धुमाकूळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यात मोबाईल चोरांचा धुमाकूळ
पुण्यात मोबाईल चोरांचा धुमाकूळ

पुण्यात मोबाईल चोरांचा धुमाकूळ

sakal_logo
By

पुणे, ता. ७ : पुणे शहराच्या वेगवेगळ्या भागात मोबाईल चोरट्यांनी ७ ते ८ जणाकडील वस्तुंची जबरी चोरी करीत अक्षरशः धुमाकूळ घातल्याने नागरिक हैराण झाले. हडपसर व सोलापूर रस्त्यावर सर्वाधिक घटना घडल्या आहेत. त्यापाठोपाठ चंदननगर, कोंढवा भागात अनेक नागरिकांचे मोबाईल हिसकावून नेले. दरम्यान, हडपसर पोलिसांनी एका चोरट्यास अटक केली.
चंदन नगर पोलिस ठाण्यात विनय काशिनाथ दौंडकर (वय ३४, रा. खराडी) यांनी फिर्याद दिली आहे. अजय रामबहादूर खत्री (वय २५, रा. खांदवेनगर) हे देखील चंदननगर परिसरातून जात होते. ते गेरा कॉमर्स झोन कंपनीजवळ आले, त्यावेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी त्याच्या हातातील सात हजारांचा मोबाईल हिसकावून नेला. कोंढवा परिसरातील पिसोळी परिसरात ऋतिक लहानू कडू (वय २१, रा. पद्ममावतीनगर) यांच्याकडील १० हजारांचा मोबाईल दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेला. तर हडपसर येथे अंकित शिवाजी बैनवाड (वय २१) याला चाकूचा धाक दाखवून चोरट्यांनी त्यांच्या खिशातील ८ हजार रुपयांचा मोबाईल व तीन हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लुटून नेली. सोलापूर रस्त्यावर शंकर मोहन ढावरे (वय २५, रा. साडेसतरा नळी, हडपसर) या तरुणालाही दुचाकीवरील दोघांनी चाकूचा धाक दाखवून मोबाईल हिसकावून नेला. याच प्रकरणात ओंकार विनोद मासाळ ऊर्फ सलीम शेख (वय २२, रा. जुना बाजार, मंगळवार पेठ) यास अटक करण्यात आली.

बसथांब्यावरील नागरिक लक्ष्य
लातूरहून कामानिमित्त आलेले संजय धनराज चव्हाण (वय ४६) हडपसर भागातील चितळे मिठाई दुकानासमोर थांबले होते. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या दंडावर चाकूने वार करून त्यांच्याकडील रोकड हिसकावून नेली. सोलापूर रस्त्यावर बसची वाट पाहत थांबलेल्या रोहित श्रीकांत कसबे (वय २३, रा. पंढरपूर) यांनाही चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून मोबाईल आणि चांदीची साखळी असा १२ हजारांचा ऐवज चोरून नेला. हडपसर परिसरातील गाडीतळ पीएमपी थांब्यावर रिक्षाचालक मकरंद मल्हारी घावटे (वय २७, रा. शेवाळवाडी) याला दुचाकीस्वार चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून मोबाईल हिसकावून नेल्याची घटना घडली.

Web Title: Todays Latest Marathi News Pct22b12768 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top