वकीलाच्या घरात घुसुन जीवे मारण्याची धमकी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वकीलाच्या घरात घुसुन जीवे मारण्याची धमकी
वकीलाच्या घरात घुसुन जीवे मारण्याची धमकी

वकीलाच्या घरात घुसुन जीवे मारण्याची धमकी

sakal_logo
By

पुणे, ता. ७ : वकीलाच्या घरात भरदिवसा घुसुन खासगी सुरक्षारक्षक कंपनीच्या टोळक्याने वकीलासह त्यांच्या वडील व कामगाराला शिविगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच त्यांच्याकडील एक दुचाकी जबरदस्तीने नेली. ही घटना शनिवारी सकाळी १० वाजता स्वारगेटजवळील आदिनाथ सोसायटीमध्ये घडली. याप्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी तिघांना अटक केली आहे.
सुग्रीव गायकवाड, हनुमंत पाटेकर, विनयकुमार अशी अटक केलेल्याची नावे आहेत. याप्रकरणी अमित शहा (वय ४१, रा. आदिनाथ सोसायटी, स्वारगेट) यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे वकील असून त्यांची कात्रज येथे प्राणीमित्र संस्था आहे. त्यांनी एका कंपनीकडून ४ दुचाकी घेतल्या होत्या. या दुचाकीचे काही पैसे फिर्यादी यांनी दिले नव्हते. या कारणातुन संबंधित खासगी सुरक्षारक्षक कंपनीच्या ४ ते ५ जणाचे टोळके शनिवारी सकाळी १० वाजता फिर्यादी हे त्यांच्या कुटुंबासमवेत घरी असताना तेथे आले.होते. फिर्यादीने घराचा दरवाजा उघड़ताच टोळके, त्यांच्या घरात घुसले. त्यांनी फिर्यादीस शिविगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांनी फिर्यादीच्या कारमध्ये असलेली दुचाकीची चावी घेतली. त्यानंतर त्यांनी फिर्यादीच्या वडीलांनाही जीवे मारण्याची धमकी देत त्यांच्याकडुनही दुचाकीची चावी घेत मोबाईल जबरदस्तीने घेण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यावरच न थांबता त्यांनी फिर्यादीच्या कामगारालाही जीवे मारण्याची धमकी देत त्याच्याकड़ील मोबाइल हिसकावुन घेतला. त्यानंतर ते पसार झाले. भरदिवसा घडलेल्या या प्रकाराने संबंधित नागरीकाचे कुटुंबीय मोठ्या प्रमाणात घाबरले. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक तुषार भोसले करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Pct22b12772 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top