विमानतळावर २६ लाखांचे सोने जप्त; दोघे अटकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विमानतळावर २६ लाखांचे सोने जप्त; दोघे अटकेत
विमानतळावर २६ लाखांचे सोने जप्त; दोघे अटकेत

विमानतळावर २६ लाखांचे सोने जप्त; दोघे अटकेत

sakal_logo
By

पुणे, ता. ९ : दुबईहून विमानाने आलेल्या प्रवाशाला सीमाशुल्क विभागाच्या (कस्टम) पथकाने लोहगाव येथील विमानतळावर पकडले. पथकाने प्रवाशांकडून तस्करी करून आणलेले ५०० ग्रॅम वजनाचे, २६ लाख ४६ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त केले. तसेच त्याच्याकडून दागिने घेण्याच्या तयारीत असलेल्या एका व्यक्तीलाही विमानतळाच्या बाहेर ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध सीमाशुल्क कायद्यानुसार विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रवासी संशयास्पदरीत्या उतरला. तसेच तो विमानतळाच्या आवारातून घाईघाईने बाहेर पडत असताना सीमाशुल्कच्या पथकाला संशय आला. त्यांनी संशयावरून त्याच्याकडील सामानाची तपासणी केली. त्याच्याकडे सोन्याच्या बांगड्या, साखळी सापडली.

Web Title: Todays Latest Marathi News Pct22b12782 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top