पुणे पोलिसांनी बेकायदेशीर भोग्यांवर कारवाई करावी मनसेची पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे पोलिसांनी बेकायदेशीर भोग्यांवर कारवाई करावी

मनसेची पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे मागणी
पुणे पोलिसांनी बेकायदेशीर भोग्यांवर कारवाई करावी मनसेची पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे मागणी

पुणे पोलिसांनी बेकायदेशीर भोग्यांवर कारवाई करावी मनसेची पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे मागणी

sakal_logo
By

पुणे, ता. १० : उच्च न्यायालयाने वारंवार ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत आदेश देऊनही पुणे पोलिसांकडून त्याविषयी सक्त कारवाई होत नाही. आता तरी पुणे पोलिसांनी शहरातील बेकायदेशीर भोग्यांवर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे मंगळवारी केली.

मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेऊन आपल्या मागण्याचे निवेदन त्यांच्याकडे दिले. या वेळी मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सातत्याने भोंग्याबाबत भूमिका मांडली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री दहा ते सकाळी सहा यावेळेत भोंगे, फटाके, वाद्ये वाजविण्यास मनाई आहे. तरीही शहरात या नियमाचे उल्लंघन करीत ध्वनिप्रदूषण केले जाते. तरीही पोलिस कारवाई करत नसल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. न्यायालयाच्या दट्ट्यानंतर तरी पोलिसांनी या गंभीर प्रश्नाची दखल घेऊन कारवाई करावी तसेच जनजागृती अभियान राबवावे, अशी मागणी साईनाथ बाबर यांनी केली.उच्च न्यायालयाने मुंबई पोलिस आयुक्तांकडून ध्वनिप्रदूषणाबाबात कृती आराखडा मागवला आहे. अशी वेळ पुणे पोलिसांवर येऊ नये, यासाठी पुणे पोलिसांनी बेकायदेशीर भोग्यांवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

Web Title: Todays Latest Marathi News Pct22b12787 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top