तळजाई बचाव अभियानाचे निषेध आंदोलन स्थगित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तळजाई बचाव अभियानाचे निषेध आंदोलन स्थगित
तळजाई बचाव अभियानाचे निषेध आंदोलन स्थगित

तळजाई बचाव अभियानाचे निषेध आंदोलन स्थगित

sakal_logo
By

पुणे, ता. १३ : तळजाई टेकडीवरील जैवविविधता प्रकल्पाची सुधारित आखणी व नविन सुधारित आराखडा नागरिकांच्या सहकार्याने तयार करण्यात येईल. तसेच, तळजाई टेकडी परिसरात कुठल्याही प्रकारची सिमेंटची बांधकामे करण्यात येणार नाही, असे लेखी आश्‍वासन पत्र वनविभागाकडून मिळाल्यामुळे तळजाई बचाव अभियानातर्फे रविवारी (ता. १५) नियोजित निषेध आंदोलन स्थगित केल्याचे जाहीर केले.

या अभियानात सहभागी झालेले अमित अभ्यंकर, अमित शहाणे, इंद्रजित चिखलीकर आणि इंद्रनील सदलगे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. या पुढे वनविभागामार्फत तळजाई टेकडीवर केवळ वृक्षारोपणाची कामे केली जातील, अशी माहिती उपवनसंरक्षक राहुल पाटील यांच्याकडून पत्रकाद्वारे देण्यात आली. तळजाई टेकडी परिसरात मियावाकी वन, औषधी वनस्पती वन, मिश्र प्रजातीचे वन, बांबू वन, उंच रोपवन या स्वरूपाची कामे करण्यात येणार आहे. तसेच, राज्यमंत्री (वन) दत्तात्रेय भरणे यांनी दिलेल्या सूचनेनुसार, पुणे वनविभागामार्फत तळजाई टेकडी परिसरात केवळ वृक्षारोपणाची कामे करण्यात येतील. येत्या पावसाळ्यात टेकडीवर नागरिकांच्या सहभागातून वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. तसेच, सामाजिक माध्यमातून पसरणाऱ्या अफवांवर विश्‍वास ठेऊ नये, असे आवाहन वन विभागाने केले.

तळजाई टेकडीवर होणाऱ्या बांधकाम आणि काँक्रिटीकरण प्रश्नाबाबत पर्यावरणप्रेमींनी बुधवारी पुणे वन विभागाचे उपवसंरक्षक राहुल पाटील यांची भेट घेतली. त्यावेळी खासदार वंदना चव्हाण उपस्थित होत्या. यावेळी तळजाई बचाव अभियानातील नागरिकांनी लेखी मागण्या अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. नागरिकांच्या मागण्या मान्य करत तळजाईवर केवळ परदेशी झाडांच्या जागी स्थानिक प्रजातींची झाडे लावण्यात येतील, असे सांगण्यात आले. त्यामुळे आता निषेध आंदोलन स्थगित करण्यात येत आहे. मात्र, मान्य केलेल्या कोणत्याही गोष्टी अमलात आणताना हयगय झाल्यास नागरिक पुन्हा रस्त्यावर उतरतील, असा इशारा अभियानातील सहभागी पर्यावरणप्रेमींनी दिला.

Web Title: Todays Latest Marathi News Pct22b12792 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top