पहाडी पोपट, लव्हबर्ड पाळणाऱ्यास अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पहाडी पोपट, लव्हबर्ड पाळणाऱ्यास अटक
पहाडी पोपट, लव्हबर्ड पाळणाऱ्यास अटक

पहाडी पोपट, लव्हबर्ड पाळणाऱ्यास अटक

sakal_logo
By

पुणे, ता. १९ : इमारतीच्या छतावर पहाडी पोपट तसेच लव्हबर्डला पिंजऱ्यात ठेवणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. वनविभाग तसेच गुन्हे शाखेच्या पथकाने पक्षांची सुटका केली. रास्ता पेठ भागात ही कारवाई करण्यात आली. रहिमतुल्ला शौकतउल्ला खान (वय ५७, रा. पेंशनवाला मशीदीसमोर, रास्ता पेठ) असे अटक करण्यात आलेल्यांचे नाव आहे. खान यांच्या विरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून वनसंरक्षक काळुराम कड यांनी समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. खान यांनी इमारतीच्या छतावर एका पिंजऱ्यात बजरी जातीचे १२६ लव्हबर्ड आणि तीन पहाडी पोपटांना ठेवल्याची तक्रार वनसंरक्षक विभागाकडे आली होती. एकाच पिंजऱ्यात पक्षांना कोंडून त्यांना निदर्यपणी वागणूक देण्यात आल्याचे तक्रारदाराने सांगितले होते.

Web Title: Todays Latest Marathi News Pct22b12817 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top