मॉन्सूनची वाटचाल पुन्हा सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मॉन्सूनची वाटचाल पुन्हा सुरू
मॉन्सूनची वाटचाल पुन्हा सुरू

मॉन्सूनची वाटचाल पुन्हा सुरू

sakal_logo
By

पुणे, ता. २६ : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांची (मॉन्सून) मंदावलेली वाटचाल गुरुवारी (ता. २६) पुन्हा सुरू झाली आहे. अरबी समुद्रात दाखल झाल्यानंतर तब्बल सहा दिवसांनी मॉन्सूनने पुढे चाल केली आहे. श्रीलंकेच्या निम्म्या भागासह, अरबी समुद्र, मालदीव, कोमोरिन भाग, बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात मॉन्सूनने प्रगती केली आहे.

मॉन्सून या वर्षी अंदमानच्या दक्षिण समुद्रात वेळेआधी दाखल झाला. अंदमानमध्ये १६ मे रोजी दमदार हजेरी लवल्यानंतर मॉन्सूनची वेगवान वाटचाल सुरू होती. त्याने १८ मे रोजी संपूर्ण अंदमान-निकोबार बेटसमूह व्यापला. त्याने २० मे रोजी पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रातूनही पुढे प्रगती सुरू केली. मात्र त्यानंतर मॉन्सून वाऱ्यांची पुढील प्रगती मंदावली होती.

श्रीलंकेमध्ये मॉन्सूनने २० ते २५ मे रोजी मुक्काम केला होता. त्यानंतर गुरुवारी मॉन्सूनने पुन्हा उत्तरेकडे प्रवास सुरू केला आहे, अशी माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. केरळमध्ये एक जूनला मॉन्सून दाखल होतो. त्यामुळे देशात दाखल होणाऱ्या मॉन्सूनवर बारकाईने लक्ष ठेऊन असल्याचेही खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले.

मॉन्सूनच्या पुढील वाटचालीस पोषक हवामान असल्याने शनिवारपर्यंत (ता. २८) दक्षिण अरबी समुद्र, संपूर्ण मालदीव, लक्षद्वीप बेटे आणि कोमोरीन समुद्राच्या आणखी काही भागात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे. तसेच मॉन्सूनच्या केरळातील आगमनाचेही हवामान विभागाकडून निरीक्षण सुरू आहे.

पुण्यात वाढणार उन्हाचा चटका
शहरात गुरुवारी कमाल तापमानाचा ३६.१ अंश सेल्सिअस नोंदला गेला. सरासरीपेक्षा फक्त ०.१ अंश सेल्सिअसने वाढ नोंदली गेली. मात्र, पुढील दोन दिवसांमध्ये कमाल तापमानाचा एक अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे शहर आणि परिसरात पुढील दोन दिवस उन्हाचा चटका वाढेल. या दरम्यान आकाश मुख्यतः निरभ्र राहणार आहे. संध्याकाळी अंशतः ढगाळ वातावरण होईल, असा अंदाज खात्याने वर्तविला आहे.

केरळातील आगमनाचा मुहूर्त टळणार
यंदा मॉन्सून २७ मे रोजी केरळात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने यापूर्वीच वर्तविली होती. केरळातील आगमनात चार दिवसाची तफावत होण्याची शक्यताही गृहीत धरण्यात आली होती. मॉन्सूनचे केरळातील आगमन आणखी काही दिवस लांबण्याची शक्यता आहे. केरळातील आगमनाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pct22b12852 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top