बेपत्ता झालेल्या दोन तरुणांचे मृतदेह सापडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेपत्ता झालेल्या दोन तरुणांचे मृतदेह सापडले
बेपत्ता झालेल्या दोन तरुणांचे मृतदेह सापडले

बेपत्ता झालेल्या दोन तरुणांचे मृतदेह सापडले

sakal_logo
By

पुणे, ता. ११ : मागील चार दिवसांपासून बेपत्ता झालेल्या दोन तरुणांचे मृतदेह शनिवारी विश्रांतवाडी येथील खाणीतील पाण्यात आढळून आले. दोन्ही तरुण मित्र होते. दरम्यान, त्यांचा खून झाल्याचा संशय त्यांच्या नातेवाइकांनी व्यक्त केला आहे.

विकी प्रकाश लंके (वय २०), सुशांत सचिन बडदे (वय २१, दोघेही रा. विश्रांतवाडी), अशी मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात शनिवारी रात्री उशिरा अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली. लंके व बडदे हे दोघेही मित्र होते. ते विश्रांतवाडीतील भीमनगर परिसरात राहण्यास होते. लंके हा सराईत गुन्हेगार होता. दोघेही बुधवारी रात्री बेपत्ता झाले होते. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतल्यानंतर विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याबाबत तक्रार दिली होती.

दरम्यान, शनिवारी दुपारी विश्रांतवाडी परिसरातीलच एका खाणीतील पाण्यामध्ये दोघांचेही मृतदेह तरंगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार विश्रांतवाडी पोलिस व अग्निशामक दलाने घटनास्थळी जाऊन दोन्ही मृतदेह पाण्यातून बाहेर काढले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविले. शवविच्छेदनात अहवालातूनच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Pct22b12930 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top