वॉशिंग मशिन दुरुस्त करताना स्फोट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वॉशिंग मशिन दुरुस्त करताना स्फोट
वॉशिंग मशिन दुरुस्त करताना स्फोट

वॉशिंग मशिन दुरुस्त करताना स्फोट

sakal_logo
By

पुणे, ता. १२ : घरात वॉशिंग मशिनची दुरुस्त करताना ब्लो गॅस टॉर्चचा स्फोट झाला. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. ही घटना रविवारी सायंकाळी सात वाजता भवानी पेठेत घडली.
या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकारी विविध पथकांच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. संबंधित घटना ही कोणत्याही प्रकारे घातपात किंवा संशयास्पद कृत्य नसल्याचे समर्थ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांनी सांगितले.
भवानी पेठेतील एका सोसायटीच्या सदनिकेत इलेक्ट्रिक वस्तू दुरुस्त करणारी एक व्यक्ती राहते. रविवारी सायंकाळी सात वाजता ते घरात वॉशिंग मशिन दुरुस्तीचे काम करत होते. त्यावेळी ब्लो गॅस टॉर्चचा स्फोट झाल्याने मोठा आवाज झाला. या आवाजाने खिडकीच्या काचा फुटल्या. परंतु या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. संबंधित व्यक्तीकडे पोलिसांनी चौकशी केली, तेव्हा वॉशिंग मशिन दुरुस्तीवेळी हा प्रकार घडल्याचे त्याने सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Pct22b12931 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top