
चिमुकलीची दृष्टी वाचविण्यासाठी आईची धावाधाव
पुणे - साडेतीन वर्षांच्या चिमुकलीच्या उजव्या डोळ्याच्या ऑप्टिक मज्जातंतूमध्ये (ऑप्टिक नर्व्ह) ट्यूमर आहे. न्युरो फायब्रोमाटोसिस या रोगामुळे हा आजार होतो. ज्यामुळे आतापर्यंत या चिमुकलीची उजव्या डोळ्याची दृष्टी गेली असून, तिच्या डाव्या डोळ्याला संसर्ग होण्यास सुरुवात झाली आहे.
मेंदूच्या विविध भागांमध्ये हा ट्यूमर वाढत आहे. सध्या ट्यूमर मेंदूच्या मध्यभागी आहे. याकरिता डॉ. विजय आनंद रेड्डी यांनी सुचविलेली रेडिएशन थेरपी करणे गरजेचे आहे. परंतु, आतापर्यंत याचे निदान करण्यासाठी हजारो रुपये खर्च झाल्यामुळे ही थेरपी करण्यासाठी पैशांची जुळवाजुळव करणे अशक्य होत आहे.
नवी मुंबई येथे राहणाऱ्या प्रीती आणि संदेश गोतड या जोडप्याने आपली अडचण सांगताना म्हटले, ‘महाराष्ट्रात या ट्यूमरसाठी योग्य उपाय नाहीत. हे सगळं आमच्या आवाक्याबाहेरचे असणार, हे माहिती असून आम्ही हैदराबाद गाठले. तिथे डॉक्टरांनी रेडिएशन थेरपी करण्याचे सुचवले. त्यासाठी खर्च साडेचार लाख रुपये असून त्यांच्या हातात पंधरा दिवसच शिल्लक आहे.’
तरिनीच्या थेरपीसाठी येणारा खर्च मोठा आहे. त्यामुळे समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन मुलीचे वडील संदेश गोताड यांच्या एसबीआय बँक (शाखा सायन), आयएफसी कोड : SBIN०००४२९६, खाते क्रमांक : ३६०३४२३९९४२ मध्ये मदत जमा करावी. अधिक माहितीसाठी संपर्क : ७७३८१२८४९९, ९७७३५६१४२२.
Web Title: Todays Latest Marathi News Pct22b13020 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..