
नोकरीच्या अमिषाने फसवणूक; एकाला कोठडी
पुणे, ता. २ : महानगरपालिकेमध्ये क्लार्क म्हणून नोकरी लावण्याच्या अमिषाने चौघांची १७ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एकाला येरवडा पोलिसांनी अटक केली. पाच जुलैपर्यंत त्याला पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
संतोष शांतीलाल वाल्हेकर (रा. ताडीवाला रस्ता) असे पोलिस कोठडी झालेल्याचे नाव आहे. याबाबत वाघोली येथे राहणाऱ्या ३६ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. हा प्रकार ऑक्टोबर २०१९ ते आतापर्यंतच्या कालावधीत घडला. नोकरीसाठी वरिष्ठांना पैसे द्यायचे आहेत, असे सांगून पैसे घेतले. त्यानंतर नोकरी तर लावलीच नाही. पैसेही परत दिले नसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. गुन्ह्यातील रक्कम जप्त करण्यासाठी, तसेच त्याचे आणखी कोण साथीदार आहेत का, आणखी कोणाची आर्थिक फसवणूक केली आहे का, याच्या शोधासाठी त्याला पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील योगेश कदम यांनी केली.
Web Title: Todays Latest Marathi News Pct22b13055 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..