
पुण्यात पावसाची हजेरी
पुणे, ता. ५ : शहरात सलग दुसऱ्या दिवशी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. मंगळवारी सकाळपासूनच आकाश सामान्यतः ढगाळ होते. बहुतेक ठिकाणी पावसाची संततधार दिवसभर पाहायला मिळाली. आठवडाभर तरी शहरात पावसाचा जोर कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
मंगळवारी शिवाजीनगर येथे २.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली, तर परिसरात सर्वाधिक पावसाची नोंद चिंचवड येथे ११. मिलिमीटर एवढी झाली. शहरात जवळपास सर्वत्रच पावसाने हजेरी लावल्याने कमाल तापमानात लक्षणीय घट झाली आहे. शहरातील सरासरी कमाल तापमान २८.१ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २१.९ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. त्यामुळे शहरात आता गारवा वाढला आहे.
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र, दक्षिणेकडे सरकलेला मॉन्सूनचा आस, अरबी समुद्रावरून वाहणारे जोरदार प्रवाह यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. कोकणात जोरदार पावसाला सुरुवात झाली असून, उर्वरित राज्यातही पावसाने हजेरी लावली आहे. बुधवारी (ता.६) दक्षिण कोकणात मुसळधार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा, विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर मराठवाडा, विदर्भात विजांसह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
----
दिवसभरातील पाऊस (मिलिमीटरमध्ये)
शिवाजीनगर ः २.८
लोहगाव ः ८.०
चिंचवड ः ११.५
लवळे ः ४.५
Web Title: Todays Latest Marathi News Pct22b13072 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..