सुगरण स्पर्धेचे बक्षीस वितरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुगरण स्पर्धेचे बक्षीस वितरण
सुगरण स्पर्धेचे बक्षीस वितरण

सुगरण स्पर्धेचे बक्षीस वितरण

sakal_logo
By

पुणे, ता. १० : गेल्या वर्षी ‘सकाळ’ व ‘ॲग्रोवन’तर्फे महिलांसाठी आयोजित केलेल्या ‘सुगरण’ स्पर्धेच्या पुणे शहर पश्चिम विभागातील विजेत्यांचा बक्षीस वितरण समारंभ नुकताच पार पडला. या वेळी विजेत्या महिलांना विविध बक्षीसे देण्यात आली.

श्री खंडेराय शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. सागर बालवडकर यांच्या विजेत्यांना बक्षीसांचे वितरण करण्यात आले. या वेळी ‘सकाळ’चे वरिष्ठ वितरण व्यवस्थापक संतोष कुडले उपस्थित होते. प्रथम क्रमांकाचे रेफ्रिजरेटरचे बक्षीस रेखा विजय थोरात, दुसऱ्या क्रमांकाचे मायक्रोवेव्ह ओव्हनचे बक्षीस प्रियांका विधाते, सुनीता येवले, अश्विनी कुलकर्णी व निमा बिधारे यांना, तर तिसऱ्या क्रमांकाचे मिक्सर-फूड प्रोसेसरचे बक्षीस आठ जणींना देण्यात आले.
मागील वर्षी १० सप्टेंबर ते ११ डिसेंबर या कालावधीत घेण्यात आलेल्या या स्पर्धेला महाराष्ट्र व गोवा राज्यातील महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ‘सकाळ’ व ‘ॲग्रोवन’च्या अंकातील सदर वाचून प्रश्नांच्या उत्तराचे कुपन चिकटवा व बक्षीसे जिंका, अशी कार्यपद्धती होती. एकूण ९० पैकी बरोबर असलेली ८० उत्तरांची कुपन्स बक्षिसासाठी ग्राह्य धरण्यात आली. सदरामध्ये खाद्यपदार्थ व आरोग्य या विषयावरील महिलांसाठी माहिती प्रसिद्ध करण्यात आली होती. सहभागी प्रत्येक स्पर्धकाला बॉस कंपनीची वॉटर बॉटल हे हमखास बक्षिस प्रवेशिका जमा करताना देण्यात आले होते.


‘सकाळ’च्यावतीने आयोजित करण्यात आलेली सुगरण स्पर्धा गृहिणींसाठी नक्कीच उपयुक्त आणि ऊर्जा देणारी आहे. यासारख्या स्पर्धांमधून महिलांच्या कलागुणांना वाव मिळण्यास मदत होते.
- डॉ. सागर बालवडकर, सचिव, श्री खंडेराय प्रतिष्ठान, बालेवाडी.

PNE22S76920

Web Title: Todays Latest Marathi News Pct22b13102 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..