जिल्ह्यात पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्ह्यात पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार
जिल्ह्यात पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार

जिल्ह्यात पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार

sakal_logo
By

पुणे, ता. ११ : शहर आणि परिसरात रविवारी (ता. १०) रात्रीपासून सातत्याने पाऊस सुरू आहे. पुढील दोन दिवसही शहरात ३५ मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाद्वारे वर्तविली आहे. मंगळवारी (ता. १२) अति जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर पावसाचा ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे.

सोमवारी (ता. ११) दिवसभर शहरासह उपनगरांत पावसाच्या मध्यम सरी पडत होत्या. रात्री साडेआठ वाजेपर्यंत शहरात २७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सध्या मॉन्सून सक्रिय असल्याने पुढील ७२ तास जिल्ह्यात पावसाच्या मध्यम ते जोरदार सरी अशाच कायम राहणार आहेत. राज्यावर पावसाचे ढग दाटून आले आहेत, त्यामुळे सध्या जिल्ह्यात संततधार पाऊस पडत आहे. घाट परिसरात जोरदार सरींमुळे दरडी कोसळण्याच्या घटना घडत असल्याने नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन हवामानशास्त्र विभागाने केले आहे.

रविवारी रात्री सुरू झालेला पाऊस सोमवारीदेखील सुरू आहे. सातत्याने पडत असलेल्या पावसामुळे घराबाहेर पडलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहनचालकांनाही देखील अडचणी निर्माण होत आहेत. शहर व परिसरात पुढील तीन दिवस म्हणजेच गुरुवारपर्यंत (ता. १४) आकाश संपूर्ण ढगाळ राहून मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दरड कोसळण्याच्या घटनांमुळे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना त्यांच्या परिसरातील धोकादायक घरे व इमारतींची पाहणी करून आवश्यक त्या सूचना देऊन काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच, धोकादायक घर, इमारतीतील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलविण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.

घाटमाथ्यावर पावसाचा ‘रेड अलर्ट’
हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील तीन दिवस जिल्ह्याच्या घाट परिसरात जोरदार ते तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस घाट परिसरात पावसाचा ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे.

पुण्यातील पावसाची नोंद (मिलिमीटरमध्ये)
पुणे शहर : २७
पाषाण : १६.८
लोहगाव : १७.४
चिंचवड : २६
लवळे : ३५
मगरपट्टा : १२

Web Title: Todays Latest Marathi News Pct22b13113 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..