पुण्यात वाहतूक कोंडीचा बट्याबोळ वाहनचालक अडकले ः एकीकडे पाऊस, दुसरीकडे नागरिक त्रस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यात वाहतूक कोंडीचा बट्याबोळ

वाहनचालक अडकले ः एकीकडे पाऊस, दुसरीकडे नागरिक त्रस्त
पुण्यात वाहतूक कोंडीचा बट्याबोळ वाहनचालक अडकले ः एकीकडे पाऊस, दुसरीकडे नागरिक त्रस्त

पुण्यात वाहतूक कोंडीचा बट्याबोळ वाहनचालक अडकले ः एकीकडे पाऊस, दुसरीकडे नागरिक त्रस्त

sakal_logo
By

लोगो ः #Trafficjam

पुण्यात वाहतुकीचा बट्याबोळ

वाहनचालक अडकले ः एकीकडे पाऊस, दुसरीकडे नागरिक त्रस्त
पुणे, ता. ११ : मुसळधार पावसामुळे शहरातील वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला. दिवसभर वाहतूक विस्कळित होती; मात्र रात्री वाहतूक कोंडीने अक्षरशः कळस केला. डेक्कन, कर्वे रस्ता, गणेशखिंड रस्ता, शिवाजीनगर या प्रमुख रस्त्यांवर रात्री उशिरापर्यंत वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला. एकीकडे पाऊस तर दुसरीकडे एक ते दीड तास वाहतूक कोंडीत अडकण्याची शिक्षा वाहनचालकांना मिळाली. त्यातून रुग्णवाहिकादेखील सुटू शकल्या नाहीत. त्यामुळे वाहतूक पोलिस व महापालिका प्रशासनाची बेफिकिरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली.
शहरात रविवारी रात्रीपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यानंतर सोमवारी सकाळीही पाऊस सुरूच होता. परिणामी सोमवारी सकाळपासून शहराच्या वेगवेगळ्या भागात वाहतूक विस्कळीत झाली होती. सायंकाळी तरी वाहतूक कोंडीतून सुटका मिळेल, ही नागरिकांची अपेक्षा फोल ठरली. सायंकाळी सात वाजल्यापासून जोरदार पाऊस सुरू झाल्याने डेक्कन, कर्वे रस्ता, विधी महाविद्यालय रस्ता, प्रभात रस्ता,भांडारकर रस्ता, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, गणेशखिंड रस्ता, बाणेर, पाषाण, बावधन रस्ता, औंध रस्ता, खडकी, स्वारगेट येथे मोठ्या प्रमाणांत वाहतूक कोंडी झाली होती.
वाहतूक विस्कळत होण्यास आणखी भर पडली.

या ठिकाणी वाहनांच्या रांगा
- कर्वे रस्ता,
- विधी महाविद्यालय रस्ता,
- प्रभात रस्ता,
- भांडारकर रस्ता,
- डेक्कन
- नळस्टॉप येथील दुहेरी उड्डाणपूल
- औंध रस्ता
- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ रस्ता
- येरवडा, नगर रस्ता, खडकी
----

रुग्णवाहिका अडकली कोंडीत !
सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास एक कार्डियाक रुग्णवाहिका रुग्णाला घेऊन औंधहून शिवाजीनगरला निघाली होती. मात्र ही रुग्णवाहिका केंद्रीय विद्यालयाजवळच वाहतूक कोंडीमध्ये अडकली होती. दरम्यान, काही नागरिकांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात थांबलेले वाहतूक पोलिस तसेच चतु:शृंगी पोलिसांना माहिती देऊन रुग्णवाहिकेला मार्ग करून देण्याची विनंती केली.

भोरमध्ये विद्युतपुरवठा खंडित
भोर परिसरात मुसळधार पावसामुळे आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मागील २४ तासात शहरानजीकच्या रस्त्यांवर पाच ठिकाणी झाडे पडली. सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. मात्र, रस्त्यांवरील वाहतुकीत विस्कळीतपणा आला आणि विजेच्या खांबांवर झाडे कोसळल्याने विजपुरवठा खंडीत झाला.

सिग्नल बंद करून वाहतूक नियमन
पावसामुळे चारचाकी वाहने मोठ्या संख्येने रस्त्यावर आली. त्यामुळे अनेक सिग्नल बंद करून वाहतूक पोलिसांना कोंडी सोडवावी लागली. बेशिस्त वाहनचालकांमुळे मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवरही वाहतूक विस्कळित होती.
नांदेड गावाजवळ मुख्य सिंहगड रस्त्यावर झाड कोसळले. कर्वे रस्त्यावर नेहमीप्रमाणे दुहेरी उड्डाण पुलामुळे वाहतूक कोंडी झाली होती.

Web Title: Todays Latest Marathi News Pct22b13114 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top