पुणे महापालिकेचे दोन अभियंते लाच घेताना ‘एसीबी’च्या जाळ्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे महापालिकेचे दोन अभियंते 
लाच घेताना ‘एसीबी’च्या जाळ्यात
पुणे महापालिकेचे दोन अभियंते लाच घेताना ‘एसीबी’च्या जाळ्यात

पुणे महापालिकेचे दोन अभियंते लाच घेताना ‘एसीबी’च्या जाळ्यात

sakal_logo
By

पुणे, ता. ११ : महापालिकेच्या बंडगार्डन पाणी पुरवठा विभागातील दोन अभियंत्यांना लाचलुचपत विभागाच्या (एसीबी) पथकाने सोमवारी वीस हजार रुपयांची लाच घेताना अटक केली. दरदिवशी पाचपेक्षा जास्त पाण्याचे टँकर भरून देण्यासाठी दोघांनी लाचेची मागणी केली होती.

उपअभियंता मधुकर दत्तात्रय थोरात (वय ५६), कनिष्ठ अभियंता अजय भारत मोरे (वय ३७), अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्यावर कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी ६३ वर्षीय व्यावसायिकाने तक्रार दिली होती.‘एसीबी’ने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचा टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याचा व्यवसाय आहे. तर थोरात व क मोरे हे दोघे महापालिकेच्या बंडगार्डन पाणीपुरवठा विभागात काम करतात. पाणी पुरवठा करण्यासाठी आवश्यक असलेले पास त्यांनी महापालिकेच्या कार्यालयातून घेतले आहे. प्रत्येक टँकर भरताना त्यांना एक पास द्यावा लागतो. मात्र, पास देऊन देखील मोरे याने दरदिवशी पाचपेक्षा अधिक टँकर भरून हवे असतील, तर महिन्याला २० हजार रुपयांची मागणी केली. तसेच थोरात याने देखील तक्रारदार यांच्या अनामत रक्कमेचे बिल काढण्यासाठी २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी याबाबत लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. दाखल तक्रारीची पडताळणी केली. त्यावेळी दोघांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार सोमवारी सायंकाळी बंडगार्डन पाणीपुरवठा कार्यालयात सापळा रचून दोघांना प्रत्येकी २० हजार रुपयांची लाच घेताना पथकाने पकडले.

Web Title: Todays Latest Marathi News Pct22b13115 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top