पुणे शहर परिसरामध्ये पावसाच्या सरींवर सरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे शहर परिसरामध्ये 
पावसाच्या सरींवर सरी
पुणे शहर परिसरामध्ये पावसाच्या सरींवर सरी

पुणे शहर परिसरामध्ये पावसाच्या सरींवर सरी

sakal_logo
By

पुणे, ता. १२ : शहरात सलग दोन दिवसांपासून पावसाच्या जोरदार सरी पडत आहे. जिल्ह्याच्या पश्र्चिम भागात ढग दाटून आले आहेत. त्यामुळे पावसाची संततधार काही दिवस अशीच राहणार आहे. शहर व उपनगरांच्या परिसरात बुधवारी ( ता. १३) मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून शहरात पावसाच्या सरीवर सरी पडत आहेत. शहरात मंगळवारी २९ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. संततधार पावसामुळे शहरासह उपनगरांमध्ये अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचत असून वाहतुकीचा वेग मंदावत आहे.
खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु असल्यामुळे नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे नागरिकांनी या भागात खबरदारी घ्यावी, असे आवाहन
प्रशासनाने केले आहे.

घाटात जाण्याचे टाळावे
जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर पुढील दोन दिवस अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. बुधवारी (ता. १३) घाटमाथ्यावर ११५.६ ते २०४.४ मिलिमीटर, तर काही ठिकाणी २०४ मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. सोमवारी (ता. ११) जोरदार पावसामुळे काही भागात दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी सध्या घाट परिसरात पर्यटन किंवा प्रवास टाळावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pct22b13128 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..