मनोरुग्ण तरुणाच्या मृत्यू प्रकरणी डॉक्टरसह कर्मचाऱ्यांवर गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मनोरुग्ण तरुणाच्या मृत्यू प्रकरणी डॉक्टरसह कर्मचाऱ्यांवर गुन्हा
मनोरुग्ण तरुणाच्या मृत्यू प्रकरणी डॉक्टरसह कर्मचाऱ्यांवर गुन्हा

मनोरुग्ण तरुणाच्या मृत्यू प्रकरणी डॉक्टरसह कर्मचाऱ्यांवर गुन्हा

sakal_logo
By

पुणे, ता. १६ : मनोरुग्ण तरुणाचा इमारतीवरून पडून मृत्यू झाला. या प्रकरणी डॉक्टर तसेच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या विरोधात हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
जागृती सायक्रॅटिक सेंटरचे संचालक डॉ. अमर शिंदे तसेच उपचार केंद्रातील कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी सविता सातपुते (वय ३९, रा. काळेपडळ, हडपसर) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. सातपुते यांचा मुलगा आदित्य राजेंद्र सातपुते (वय १८) याच्यावर मांजरी परिसरातील जागृती सायक्रॅटिक सेंटरमध्ये उपचार सुरू होते. १ ऑक्टोबर २०२१ रोजी आदित्यचा उपचार केंद्रातील गच्चीवरून पडून मृत्यू झाला होता. उपचार केंद्रातील कर्मचारी निरंजन पंडित याने आदित्यने घरी दूरध्वनी केला म्हणून त्याला मारहाण केली होती. आदित्यकडे दुर्लक्ष केल्याने तो इमारतीच्या गच्चीवरून पडून मरण पावला, असे आदित्यची आई सविता सातपुते यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) विश्वास डगळे करत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Pct22b13153 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top