
धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला
खडकवासला, ता. २६ : खडकवासला धरण साखळीतील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सोमवार रात्रीपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. मंगळवारी सकाळपासून पानशेत व वरसगाव धरणात पाऊस झाला नाही. दरम्यान, पानशेत धरणाच्या पाठोपाठ आज वरसगाव धरणातही ७० टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.
वरसगाव धरणात आज ७०.८२ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. पानशेत धरण मोसे नदीवर बांधलेले आहे. २ जुलै रोजी या धरणात ०.९९ टीएमसी म्हणजे ७.७१ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. पानशेत धरणाची साठवण क्षमता १२.८२ टीएमसी आहे. एक जूनपासून पानशेत धरण येथे एक हजार ४२१ मिलिमीटर पाऊस पडला आहे. आजअखेर ९.०८ टीएमसी म्हणजे ७०.८२ टक्के पाणीसाठा जमा झालेला आहे.
पानशेत धरणात आज ७५ टक्के पाणीसाठा जमा झाले आहे. पानशेत धरण अंबी नदीवर बांधलेले आहे. २ जुलै रोजी या धरणात १.०५ टीएमसी म्हणजे ९.८४ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. पानशेत धरणाची साठवण क्षमता १०.६५ टीएमसी आहे. एक जूनपासून पानशेत धरण येथे एक हजार ४५३ मिलिमीटर पाऊस पडला आहे. आजअखेर ८.१८ म्हणजे ७६.८५ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.
धरणातील पाणीसाठा
२६ जुलै (सायंकाळी पाच वाजेपर्यंत)
धरणाचे नाव / एकूण क्षमता/ उपयुक्त पाणीसाठा(टीएमसी) / टक्केवारी
खडकवासला-
१.९७ /१.७६/८९.२३
पानशेत- १०.६५/८.१८/७६.८५
वरसगाव-
१२.८२/९.०८/७०.८२
टेमघर- ३.७१/२.२२/५९.९५
चार धरणातील एकूण क्षमता ः २९.१५ टीएमसी
आजचा एकूण उपयुक्त पाणीसाठा ः २१.२५ टीएमसी (७२.८९ टक्के).
Web Title: Todays Latest Marathi News Pct22b13198 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..