तीन शिक्षकांविरुद्ध समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तीन शिक्षकांविरुद्ध समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
तीन शिक्षकांविरुद्ध समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

तीन शिक्षकांविरुद्ध समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

sakal_logo
By

पुणे, ता. ३१ : विद्यार्थ्याने वर्गात गोंधळ घातल्याच्या कारणावरून शिक्षकांनी विद्यार्थ्यास बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात तीन शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ॲँथोनी बेकील डिसोझा, गणेश मारुती धोकडे, फरीद मेहबूब पटेल अशी गुन्हा दाखल झालेल्या शिक्षकांची नावे आहेत. याप्रकरणी एका पालकाने समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी पालकांचा मुलगा रास्ता पेठेतील ऑर्नेलाज शाळेत दहावीत आहे. दोन दिवसांपूर्वी मुलगा आणि त्याचा मित्र वर्गात गोंधळ घालत होते. त्यावेळी वर्गशिक्षक ॲँथोनी यांनी मुलांना छडीने मारहाण केली. मुलांना गुडघ्यावर बसण्याची शिक्षा दिली. त्यानंतर शिक्षक धोकडे, पटेल यांनी मुलांना मारहाण केली तसेच अंतर्गत मूल्यमापन प्रक्रियेत कमी गुण देण्याची ‌ध‌मकी दिल्याचे पालकाने दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे. दरम्यान, या मारहाणीच्या घटनेनंतर मुलगा घरी आला तेव्हा तो प्रचंड घाबरला होता. पालकांनी त्याच्याकडे विचारणा केली तेव्हा त्याने शिक्षकांनी मारहाण केल्याचे सांगितले. त्यांनतर पालकांनी थेट पोलिस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली. समर्थ पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून शिक्षकांना अटक केली.

Web Title: Todays Latest Marathi News Pct22b13214 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top