
शेवटचे पाच दिवस रात्री बारापर्यंत स्पीकर
पुणे, ता. २ : न्यायालयाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून यंदाचा गणेशोत्सव उत्साहात, धूमधडाक्यात साजरा करू. गणेशोत्सव मंडळांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही, गणेशोत्सवाच्या अखेरच्या पाच दिवसांत रात्री बारा वाजेपर्यंत स्पीकर वाजविण्याची परवानगी असेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी रात्री उशिरा स्पष्ट केले.
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तालयात मंगळवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील गणेशोत्सव मंडळांची बैठक झाली. यावेळी ‘जय गणेश व्यासपीठा’चे श्रीकांत शेटे, प्रसाद कुलकर्णी, सुनील रासने, प्रवीण परदेशी, नितीन पंडित, विकास पवार, शिरीष मोहिते, पियुष शहा आदी गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी, पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक उपस्थित होते. पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी शिंदे यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. या बैठकीनंतर शिंदे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
शिंदे म्हणाले, ‘‘यंदा मंडळांना कोणतीही अडचण येणार नाही, जिल्हाधिकारी यामध्ये लक्ष घालतील. न्यायालयाच्या नियमांचे पालन करून विसर्जन मिरवणुका काढू. कोणत्याही प्रकारच्या अडचणी येणार नाही, याची योग्य खबरदारी घेतली जाईल. मंडळे सामाजिक कामे करत आहेत, त्याच पद्धतीने मंडळांनी बूस्टर डोस जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम करावे. दहीहंडी मंडळालाही परवानग्या दिल्या आहेत.’’
Web Title: Todays Latest Marathi News Pct22b13224 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..