सामंत यांची कात्रजमध्ये लवकरच जाहीर सभा शिंदे-ठाकरे गट पुन्हा आमनेसामने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सामंत यांची कात्रजमध्ये  
लवकरच जाहीर सभा  
 
शिंदे-ठाकरे गट पुन्हा आमनेसामने
सामंत यांची कात्रजमध्ये लवकरच जाहीर सभा शिंदे-ठाकरे गट पुन्हा आमनेसामने

सामंत यांची कात्रजमध्ये लवकरच जाहीर सभा शिंदे-ठाकरे गट पुन्हा आमनेसामने

sakal_logo
By

पुणे, ता. ७ : माजी मंत्री आणि शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांच्यावर कात्रज चौकात शिवसैनिकांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना नुकतीच घडली. आता त्याच कात्रज चौकात शिवसेनेच्या शिंदे गटाकडून लवकरच सामंत यांची जाहीर सभा घेण्यात येणार आहे. त्यामुळे पुन्हा शिवसेनेचे ठाकरे आणि शिंदे गट आमनेसामने येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांची दोन ऑगस्ट रोजी सायंकाळी कात्रज चौकात जाहीर सभा झाली. त्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही पुणे जिल्ह्यातील सासवडला जाहीर सभा पार पडली. पुणे शहरात मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यादिवशी सायंकाळी माजी मंत्री सामंत हे कात्रज चौकातून जात असताना ठाकरे गटातील शिवसैनिकांनी सामंत यांच्या गाडीवर हल्ला करून काच फोडली होती. या घटनेनंतर सामंत यांनी त्यांच्यावरील हा हल्ला पूर्वनियोजित आणि सुपारी देऊन केल्याचा आरोप केला होता. याबाबत सामंत यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे यांच्यासह सहा पदाधिकाऱ्यांना अटक केली असून, ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. महापालिकेच्या आगामी निवडणुकीची पूर्वतयारी आणि शहरातील शिंदे गटाची राजकीय ताकद वाढविण्याच्या उद्देशाने सामंत यांची कात्रज चौकात सभा घेण्यात येणार आहे. तसेच, शहरातील अन्य काही भागांतही सभा आणि इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. सभेच्या आयोजनासंदर्भात सामंत यांच्याशी चर्चाही झाली असून, लवकरच ही सभा होईल, असे शिवसेनेच्या शिंदे गटाचे पुणे शहर प्रमुख प्रमोद भानगिरे यांनी सांगितले.

दरम्यान, शिंदे गटाकडून शहरात राजकीय ताकद वाढविण्याच्या उद्देशाने या सभेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. परंतु सामंत यांच्यावर झालेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठीच कात्रज चौकात या सभेचे आयोजन करण्यात येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pct22b13250 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..